वॉर्ड आणि बाह्य रुग्ण विभागात निवासी डॉक्टर फिरकलेही नाहीत
यवतमाळ: ‘मार्ड’ (महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स)या संघटनेच्या आवाहनवरून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी आपल्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज सोमवारी संप पुकारला. वैद्यकीय महाविद्यालयातील १५० निवासी डॉक्टर संपात सहभागी झाले. ‘मार्ड’च्या या संपाने महाविद्यालयात रुग्णसेवा कोलमडली. मार्डकडून निवासी डॉक्टरांच्या मागण्यांचा वारंवार पाठपुरावा केला जात आहे, तरीदेखील त्याची दखल घेतली जात नाही. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत अपुर्या व मोडकळीस आलेल्या वसतिगृहांमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
हेही वाचा >>>> नागपूर : शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तरच्या ८९ जागांना कात्री?
वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या नवीन एक हजार ४३२ जागांची पदनिर्मिती करण्यात यावी, सहयोगी व सहायक प्राध्यापकांची अपुरी पदे तातडीने भरण्यात यावीत, महागाई भत्ता तातडीने लागू करावा, वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करून सर्व वरिष्ठ निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करून न्याय देण्यात यावा, यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात रद्द झालेल्या आठ जनरल मेडिसीनच्या पदव्युत्तर जागा भरण्यात याव्यात, कनिष्ठ निवासी डॉक्टरांना परीक्षा तयारीसाठी सहवेतन दोन महिन्याची रजा देण्यात यावी, आदी मागण्यांकडे संपाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले. या संपादरम्यान निवासी डॉक्टरांनी केवळ अत्यावश्यक सेवा दिली. वॉर्ड आणि बाह्य रुग्ण विभागात निवासी डॉक्टर फिरकले नाहीत. त्यामुळे आरोग्य सेवा कोलमडली होती. संपामुळे येथे आलेल्या रुग्णांची गैरसोय झाली.