लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा: नुकतेच मान्यता मिळालेल्या परंतु प्रशासकीय अडचणीमुळे कार्यान्वित होण्यात विलंब होत असलेल्या बुलढाण्यासह राज्यातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची राज्यस्तरीय आढावा बैठक आज मंगळवारी पार पडली.

बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह उच्चपदस्थ अधिकारी हजर होते. हजर नसलेले जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी’ व्हिडीओ कॉन्फरसिंग’च्या माध्यमाने सहभागी झाले. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी राज्य शासन व वैद्यकीय विभागाला दिलेल्या पत्रावरून ही बैठक लावण्यात आली.

आणखी वाचा-विधानभवनाचे प्रवेशव्दार काही वेळासाठी बंद, काय घडले?

नव्याने मान्यता देण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागेची सद्यस्थिती, जिल्हा सामान्य रुग्णालय हस्तांतरण व सामंजस्य करार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रस्ताव तथा २०२४-२५ साठी महाविद्यालय सुरू करण्यासाठी पायाभूत सुविधा या विषयांचा उहापोह या पत्रात करण्यात आला होता. वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात ही विशेष बैठक आज पार पडली. वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, नागपूर मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी तथा विविध जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा सामान्य प्रशासन अधिकारी यांची उपस्थिती होती.

बुलढाणा येथील प्रस्तावित ‘मेडिकल’ संदर्भात ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’वरून जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील तर प्रत्यक्ष बैठकीत आमदार संजय गायकवाड, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रशांत पाटील, बुलढाणा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कैलास झिने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, उपविभागीय कार्यकारी अभियंता राजेश एकडे, प्राचार्य विनोद जाधव यांची उपस्थिती होती. बैठकीत प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठीच्या समस्या संबंधित जिल्हाधिकारी व अधिकारी यांच्याकडून समजावून घेण्यात आल्या.

आणखी वाचा-“जुनी पेन्शन लागू न केल्यास शासकीय कर्मचाऱ्यांचे कामबंद”, आमदार किरण सरनाईक यांचा इशारा

‘भूखंड मिळाला मनुष्यबळ द्या’

बुलढाणा येथील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयातील अडचणींकडे आ. संजय गायकवाड यांनी लक्ष वेधले. बुलढाणा येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी हतेडी येथील ‘इ क्लास’ची जागा संपादित करण्यात आली असून त्याचा ७/१२ सुद्धा नावावर झाला असल्याचे ते म्हणाले. ही प्रक्रिया जलद करण्यासाठी मनुष्यबळ भरतीचा शासन निर्णय तातडीने निर्गमित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सलग्नित रुग्णालय हस्तांतरणाचा करार जलदगतीने व्हावा, वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपकरणे व यंत्रसामुग्री खरेदीची प्रक्रिया युद्धस्तरावर करण्यात यावी, संस्थेसाठी लेखाशीर्ष मंजूर करण्यात यावा आदी मागण्या आमदारांनी मांडल्या. सध्या केवळ अधिष्ठाता हे एकमेव पद भरलेले असल्यामुळे अन्य लिपिकवर्गीय पदाची भरती तातडीने केल्यास या वैद्यकीय महाविद्यालयाला खऱ्याअर्थाने चालना मिळेल असे प्रतिपाद त्यांनी बैठकीत केले. ना. मुश्रीफ बैठकीतच सूचनावजा निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. प्रत्यक्ष बुलढाण्याला जाऊन पाहणी व जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्याचे आदेशही त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meeting of the proposed medical college in buldhana participation of high officials including minister mushrif scm 61 mrj