नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील गट अ, ब आणि क संवर्गातील ८०२ पदांसाठी जाहिरात आली आहे. अनेक वर्षांनी ही पदभरती होणार आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या भरती मध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी २ अशी अनेक पदे आहेत. 

ही पदे – सरळसेवेने भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या http://www.midcindia.org या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने २ सप्टेंबर, २०२३ पासून ते २५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी http://www.midcinda.org या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहित मुदतीत ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज सादर करावेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mega recruitment for 802 posts of mdic opportunity for 12th and graduates dag 87 ysh
Show comments