बुलढाणा: कोणत्या ना कोणत्या कारणाने गाजत राहणारा समृद्धी महा मार्ग आज एक टोलनाका बंद पाडण्यात आल्याने पुन्हा चर्चेत आला आहे.मात्र हा टोलनाका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नव्हे तर स्वतः नाक्याच्या कर्मचाऱ्यांनीच बंद पाडलाय!… आज बुधवारी( दि १५) मेहकर टोल नाक्यावर, कामबंद आंदोलन, संतप्त कर्मचाऱ्याची घोषणाबाजी, मोफत जाणारी वाहने, यामुळे चकित होणारे वाहनचालक- मालक असे मजेदार चित्र दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवाळीत करण्यात आलेल्या या काम बंद आंदोलनाचे कारणही गंभीर आहे. कंपनीला लाखोंची कमाई मिळवून देणाऱ्या टोल कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्या पासून पगारच मिळाला नाहीये! किमान दिवाळीततरी पगार होईल अशी अपेक्षाही फोल ठरली. तसेच त्यांचे ‘पीएफ’ खाते देखील उघडण्यात आले नाही. प्रारंभी नाका चालविणाऱ्या कंपनीने हे काम दुसऱ्या कंपनीला देऊन टाकले. जेव्हापासून टोलनाका सुरू झाला, तेव्हा पासून कर्मचाऱ्यांना पगार पत्र दिलेले नाही.

हेही वाचा… काश्मिरचा केशर आता नागपुरात फुलतोय; उच्चशिक्षीत तरुण दाम्पत्याचा प्रयोग यशस्वी

यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आज टोल नाका आणि काम बंद आंदोलन केले आहे. चालक टोलचा दांडा बाजूला करून टोल न भरता वाहन नेत आहे. पगार पत्र नसल्यामुळे पी एफ सुद्धा मिळत नाही. दर तीन महिन्याला जर कंपनी बदलत राहीली तर पिएफ कोणती कंपनी देणार ?असा कर्मचाऱ्याचा सवाल आहे.

हेही वाचा… मेळघाटातील चार गावात गोरगरिबांच्या चेहर्‍यावर फुलला आनंद; सामाजिक दिवाळी अंतर्गत गरजूंना मदतीचा हात

…तर काम बंद सुरूच राहणार

दरम्यान जो पर्यंत पगार व पी एफ मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. सर्व वाहने मोफत सोडत राहणार अशी भूमिका घेतली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mehkar toll plaza at buldhana shut down on samruddhi highway by toll employees on salary issue scm 61 asj
Show comments