हिंदी भाषेविषयी तेलगू, मल्याळम किंवा कन्नड व्यक्तिच्या मनात कुठलाही राग नाही. अनेक लोक हिंदी समजतात आणि बोलतातही. मात्र, तुम्ही हिंदीमधूनच बोला अशी जबदरस्ती केली तर त्यांच्या मनात हिंदीविषयी चिड निर्माण होणे स्वाभाविक आहे, असे वक्तव्य प्रसिद्ध लेखक व ‘केंद्राच्या क्षमता निर्माण आयोगा’चे सदस्य डॉ. आर. बालसुब्रमण्यम यांनी केले. हे माझे वयक्तिक मतं असून नवीन भारताच्या निर्माणात भाषेवरून मतभेद नको, असेही ते म्हणाले.
हेही वाचा- भूकंपाचा नागपूरला धोका नाही पण….. सौम्य धक्के
‘मंथन’च्या वतीने आयोजित ‘बिल्डींग अ न्यू इंडिया’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. नवीन भारताची बांधणी करताना देशातील इतर राज्य हिंदीचा स्वीकार करत असताना दक्षिण भारतीयांना हिंदीविषय राग का?, एक देश एक भाषा असायला हवी, असा प्रश्न उपस्थितांमधून विचारण्यात आला. यावर डॉ. बालसुब्रमण्यम यांनी भाषेवरून देशात वाद नको. आज दक्षिण भारतातील सर्वच लोक हिंदी बोलतात,बंगळुरूमध्ये तर ५० टक्के लोक हिंदी बोलतात. तिथे हिंदी बोलता येत नसेल तर जगणे कठीण होऊ शकते. हिंदीचा कुठल्याही दक्षिण भारतीय व्यक्तीला राग नाही. मात्र, त्यांना हिंदीमधूनच बोला अशी जबरदस्ती करणे योग्य नाही असेह बालसुब्रमण्यम म्हणाले.
हेही वाचा- नागपूर : राष्ट्रीय लोकअदालतमध्ये २७ हजार प्रकरणे तडजोडीने निकाली
नव्या भारताविषयी बोलताना ते म्हणाले की, आज जगात आपण कुठेही गेलो तरी भारतीय व्यक्तीला आदर मिळायला लागला आहे. ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे. स्वामी विवेकानंद यांनी भारत भविष्यात जगतगुरू होईल असे सांगितले होते. ते सत्यात उतरवण्यासाठी आपल्या प्रत्येकाला काम करण्याची गरज आहे. भारताच्या थांबलेल्या विकासासाठी इंग्रजांच्या राजवटीला दोष देण्यात काहीही अर्थ नाही. आपणच आपल्या योजना राबवण्यात कमी पडलो, असेही ते म्हणाले.