नागपूर : भारत राष्ट्र समिती देशपातळीवर स्वतःचा विस्तार करण्यासाठी सर्वशक्तीनिशी सज्ज झाली असून पहिला टप्प्यात महाराष्ट्रातील २८८ मतदार संघात सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्याचे ठरले आहे.
नागपूर जिल्ह्यात २५ मे पासून हे नोंदणी अभियान प्रा. ज्ञानेश वाकुडकर, पूर्व विदर्भ संयोजक, यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती नागपूर जिल्हा समन्वयक रविकांत खोब्रागडे यांनी पत्रपरिषदेत दिली आहे.
हेही वाचा >>>चंद्रपूर: रावत गोळीबार प्रकरणाचा उलगडा; काँग्रेस समर्थित दोन भावंडांना अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
२५ मे रोजी प्रारंभ होणाऱ्या प्रचार यात्रेला वाकुडकर हे हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करतील. नांदेड येथे राज्यव्यापी शिबिरात बीआरएस नेते ’केसीआर’ यांनी जाहीर केल्याप्रमाणे, २८८ मतदार संघात २८८ प्रचार गाड्या पत्रके वाटतील, जनतेशी संवाद साधतील.