नागपूर : एचसीजी कॅन्सर सेंटर, नागपूरने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘कलर्स ऑफ एम्पॉवरमेंट’ अंतर्गत पुरुषांसाठी एक अनोखा रॅम्प वॉक आयोजित केला. स्टिलेटोसमध्ये चालण्याचे आव्हान पुरुषांना देण्यात आले होते. महिलांना दैनंदिन जीवनात कुठली आव्हाने आणि अडचणी येतात हे पुरुषांनी समजून घेण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न होता. लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी हा जाणीवजागृती उपक्रम घेण्यात आला.

हेही वाचा – चंद्रपूर: गोंडवाना विद्यापीठाला वन व आदिवासी विद्यापीठाचा दर्जा देणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

हेही वाचा – जुनी पेन्शन योजनेसह इतर मागण्या मान्य करा, अन्यथा राज्य ठप्प पडेल; आमदार सुधाकर अडबालेंचा इशारा

कॅपिटल हाइट्स, मेडिकल चौक आणि एचसीजी हॉस्पिटल परिसरात हा कार्यक्रम झाला. स्त्रियांच्या दैनंदिन संघर्षांचे प्रतीक म्हणून पुरुषांना स्टिलेटोसमध्ये चालण्याचे आव्हान देऊन, एचसीजीने स्त्रियांच्या शारीरिक आणि भावनिक बाबी समजून घेण्यासाठी पुरुषांना प्रोत्साहित केले. या उपक्रमांबद्दल बोलताना, एचसीजी एनसीएचआरआय कॅन्सर सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश्वरलू मारापाका यांनी सांगितले की, “आंतरराष्ट्रीय महिला दिन हा केवळ महिलांच्या उल्लेखनीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्याचा दिवस नसून त्यांच्या दैनंदिन संघर्षांप्रती संवेदनशील असण्याचादेखील आहे”. या वेळी रॅम्पवॉक करणाऱ्या पुरुषांनी या अनोख्या अनुभवाचे वर्णन केले.

Story img Loader