लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : वडील डॉक्टर तर भाऊ दुबईला पायलट. या सधन कुटुंबातील मानसिक आजाराचा तरुण दोन वर्षांपूर्वी लातूरहून हरवला. खूप प्रयत्नानंतरही सापडला नसल्याने त्याला शोधणाऱ्याला २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले गेले. शेवटी नागपुरातील मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तरुणाच्या घरचा पत्ता समाजसेवा विभागाने लावल्यावर तो दोन वर्षांनी घरी परतला.

मेडिकल रुग्णालय परिसरात एका पायाला गंभीर इजा व त्यात किडे झालेल्या स्थितीत एक तरुण घासून-घासून पुढे सरकत होता. मळलेले कपडे, वाढलेले केस व अंगातून दुर्गंधी बघून येथील नागरिक आपला रस्ता बदलून पुढे जात होते. या रुग्णाला मेडिकलच्या शल्यक्रिया गृहात दाखल केले गेले. डॉ. गिरीश उमरे यांच्यासह इतर डॉक्टर, परिचारिकांच्या उपचार व सेवेमुळे त्याची जखम बरी झाली.

आणखी वाचा-राज्यात विजेची मागणी वाढली

मानसिक आजार असल्याने रुग्ण आपले नाव व घरचा पत्ताही योग्यरित्या सांगू शकत नव्हता. समाजसेवा विभागाला ही माहिती दिली गेली. समाजसेवा अधीक्षक सचिन दोर यांनी बरेच दिवस रुग्णाशी संवाद साधला. एकदा रुग्णाच्या तोंडून त्याचे नाव फय्याज शेख, रा. अहमदपूर, जिल्हा- लातूर असे निघाले. अपुऱ्या माहितीच्या आधारे समाजसेवा विभागाकडून रुग्णाच्या नातेवाईकांचा शोध सुरू झाला. रुग्णाचे छायाचित्र आणि दिलेली माहिती समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आली. लातूर जिल्ह्यात ‘पोस्ट’ प्रसारित होताच समाजसेवा अधीक्षक यांच्या भ्रमणध्वनीवर फोन सुरू झाले. शेवटी रुग्ण फैयाज हा उच्चशिक्षित कुटुंबातील सदस्य असून अंशतः मनोरुग्ण असल्याचे पुढे आले. तो दोन वर्षापासून भटकत होता. तो हरवल्याची तक्रार सुद्धा पोलीस ठाण्यात दिली गेली होती. फैयाजचे वडील डॉक्टर होते. त्याचे चुलत भाऊ डॉक्टर असून एक भाऊ दुबईला पायलट असल्याचे त्याला घेण्यासाठी नागपुरातील मेडिकल रुग्णालयात आलेल्या डॉ. मिर्झा बेग (रुग्णाचे काका) यांनी सांगितले. २१ ऑगस्टला फैयाजला मेडिकलमधून सुट्टी झाली. शेवटी नातेवाईकांनी त्याला आपल्यासोबत घरी नेले. या पद्धतीने अनेक रुग्णांना घरी पाठवण्याचे काम मेडिकलच्या समाजसेवा विभागाकडून होत आहे.