लोकसत्ता टीम

नागपूर: महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, सिक्कीम या राज्यात आजपासून वादळीवाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. या अंदाजानुसार मोसमी पाऊस आता तेलंगणातील काही भाग, आंध्र प्रदेशचा बहुतांश भाग, ओडिशा, पश्चिम बंगालचा काही भाग तसेच झारखंड आणि बिहारमध्ये पुढे सरकला आहे.

nana Patole devendra fadnavis (1)
Nana Patole : “… तर विरोधकही त्या एन्काऊंटरचं समर्थन करतील”, नाना पटोलेंचं राज्य सरकारला थेट आव्हान!
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Maharashtra Rain Alert
Maharashtra Rain : कोकण, मराठवाडा, विदर्भात मुसळधारेचा अंदाज; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्यांत कसा पाऊस पडणार
dhangar community protest for reservation from scheduled tribes
अनुसूचित जमातींमधून आरक्षणासाठी धनगर समाजाचे आंदोलन
indian meteorological department predicts heavy rains in maharashtra
Maharashtra Weather Update: महत्वाची कामे हाती घेताय….? पण, मुसळधार पाऊस पुन्हा…..
Married Man Marries 15 Women in seven Indian States
Crime News : आधुनिक लखोबा! १५ जणींशी लग्न, सात राज्यांमधल्या बायकांना प्रायव्हेट फोटो दाखवून करायचा ब्लॅकमेल
aI policy in India
भारतात ‘एआय’ धोरण राबवण्यात कोणत्या राज्यांची आघाडी? कोणती राज्ये पिछाडीवर? महाराष्ट्र कुठे?
Tiger hunting, Tiger, Tiger hunter punished,
वाघाची शिकार : तब्बल ११ वर्षांनंतर शिकाऱ्याला शिक्षा…!

मोसमी पाऊस दक्षिण भारतातील ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये येत्या दोन-तीन दिवसांत पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. शुक्रवारी ओडिशात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा… यवतमाळ: वाहन दुभाजकावर आदळून चारजण ठार; घुग्गुस येथील अपघातात मारेगाव येथील सख्ख्या भावांसह पत्नींचाही मृत्यू

तसेच पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि सिक्कीममध्ये वादळ आणि पावसाबाबत ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. २३ जूनला विदर्भ, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कोकण-गोवा, किनारी कर्नाटक, किनारपट्टी आंध्र प्रदेश, यानम आणि तेलंगणा इथे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.