नागपूर : कोकणातून पावसाने आता हळूहळू काढता पाय घेण्यास सुरुवात केली, पण आता याच पावसाने उपराजधानीसह विदर्भाकडे मोर्चा वळवला आहे. नागपूर आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा राहणार असून बहुतांश भागांमध्ये पावसाची जोरदार हजेरी लागणार असल्याचा अंदाज खात्याने वर्तविला.

हेही वाचा – प्रतिक्षा संपली ! बी. फार्म. पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ

येत्या १५ जुलैपर्यंत सर्वत्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. १६ व १७ जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी पाऊस राहील तसेच २२ जुलैपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे. या काळात विजांचा कडकडाट वाढणार असून नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, अमरावती या जिल्ह्यांमध्येही अशीच परिस्थिती राहणार आहे.

Story img Loader