चंद्रपूर : नैसर्गिक वायूंचे साठे समुद्रातच आढळत होते. परंतु पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालयाने येथे २०१६-२०१७ मध्ये सर्वेक्षण केले आणि चक्क चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, बल्लारशा गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, भद्रावती आणि वरोरा तालुक्यातील भूगर्भात ३३१ स्के. कि.मी. भूभागात ३७ तर सिरोंचा ब्लॉकमध्ये ७०९ वर्ग/कि.मी. परिसरात ४७ बिलियन क्युबिक मीटर एवढे मोठे कोल बेडेड मिथेन चे साठे सापडले आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात कोल बेड मिथेन (सीबीएम) च्या साठ्यांकडे शासनाचे लक्ष २०१६-२०१७ नंतर गेले आणि विविध वैज्ञानिक पद्धतीने ( २ ड्रील करून, २/३ डी सिस्मिक सर्वे, जिओ सायन्टीफिक सर्वे, ग्रॅव्हिटी आणि मेग्नेटीक सर्वे ) सर्व्हे केला गेला.

चंद्रपूर ब्लॉक पूर्व विदर्भातील प्राणहिता – गोदावरी बेसिनमध्ये समावेश आहे. या श्रेणी-३ मध्ये येणाऱ्या बेसिनचे सविस्तर संशोधन केल्यानंतर इथे व्यावसायिक साठे आढळले. विदर्भातील २ मिथेन साठ्यासाठी २ राउंड चा लिलाव याच वर्षी २०२३ मध्ये झाला होता आणि त्याची मुदत मे २०२३ मध्ये संपली होती. चंद्रपूर व्यावसायिक ब्लॉक ३३१ स्के/किमी भूभागाचा आहे. आणि यात ३७ बिलियन क्युबिक मीटर एवढे साठे आहेत तर सिरोंचा ब्लॉक हा ७०९ स्के/किमीचा असून त्यात ४७ बिलियन क्युबिक मीटरचे साठे आहेत, असे उद्योगांच्या बैठकीत म्हटले गेले . विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनसोबत या ब्लॉक संदर्भात गेल, लॉयड आणि सोलार ग्रुपची बैठक आणि सादरीकरण झाले होते. पर्यावरण आणि वन कायद्याच्या अडचणींमुळे अजूनही कोणत्याच कंपनीने हा ब्लॉक घेतला नसला तरी पुढील संशोधन आणि लिलावामध्ये हा ब्लॉक घेतला जाण्याची शक्यता अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केली आहे.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र

हेही वाचा : शाळेत सोडतो, असे सांगून चिमुरडीला शेतात नेले अन् केलं भयंकर कृत्य; उमरखेड येथील घटनेने संताप

विदर्भ-तेलंगणात प्राणहिता गोदावरी बेसिन विदर्भ आणि तेलंगणा राज्यात प्राणहिता-गोदावरी हे स्तरित खडकाचे संपूर्ण बेसिन ३०,००० वर्ग/किमीच्या अधिक परिसरात व्यापले असून त्याची लांबी जवळ जवळ ४०० तर रुंदी १०० किमी असून या भूभागात भूपट्टीय दृष्ट्या नागपूर, चंद्रपूर – सिरोंचा ते तेलंगाना मधील अस्वरापेटा हे ४ भाग पाडण्यात आले आहेत. मात्र महाराष्ट्रात व्यावसायिक दृष्ट्या २ तर तेलंगणात ३ ब्लॉक्स पाडण्यात आले आहेत. विदर्भात कोल बेडेड मिथेनचे ८४ बिल्लीयन क्यूबिक मीटर ( ९४.४ मिलियन मेट्रिक टन ) इतके साठे आढळले आहेत .यातील नागपूर ब्लॉक मध्ये अल्प साठे असले तरी व्यावसाईक दृष्ट्या त्याला अजून मान्यता मिळाली नाही, चंद्रपूर ब्लॉक हा ३३१ वर्ग किमी भूभागाचा असून त्यात ३७ बिल्लीयन क्युबिक मीटर एवढे साठे आहेत. सिरोचा ब्लॉक हा भूभागाने मोठा असून तो ७०९ वर्ग/किमी परिसरात व्यापला आहे. तर तेलंगणा राज्यात ९२३ वर्ग/किमी भूभागात ३ ब्लॉक आहेत.

हेही वाचा : यूजीसीचे प्रथमच निर्देश! रँगिंग व अन्य बाबींचे अहवाल सादर करा

हे साठे सुद्धा व्यावसायिक दृष्ट्या उपयोगाचे समजले जात असून त्यांची लिलाव प्रक्रिया सुद्धा सुरु केली गेली आहे. यातील अस्वरापेठ हा ३८० वर्ग/किमी चा ब्लॉक ( जीएन (एन) – सीबीएम-२००५ / १११ ) मिथेनच्या साठ्याने भरलेला असल्याने त्याची बोली लागली असून तो ब्लॉक कोल्गेस मार्ट लिमिटेडला दिला आहे. चंद्रपूरच्या ब्लॉकसाठी ओएनजीसी कंपनीने काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. चंद्रपूर ब्लॉक- चंद्रपूर सेडीमेंटरी मिथेन ब्लॉक ३३१ स्के/किमी परिसरात व्यापला आहे. ३७ बिलियन क्युबिक मीटर एवढे साठे इथे अपेक्षित आहेत. या ब्लॉकमध्ये चंद्रपूर, बल्लारशा, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, भद्रावती आणि वरोरा तालुक्याचा आणि तेलंगणाच्या उत्तर आदिलाबाद तालुक्याचा समावेश होतो. इथे १९९६-९८ साली सर्वे झाला होता. परंतु मिथेनच्या साठ्यासाठी २०१६-१७ ते २०२२ पर्यंत विमानाच्या साहाय्याने सुद्धा सर्व्हे केला गेला . यात २/३ डी सिस्मिक सर्वे, जिओ सायंटीफिक सर्व्हे, ग्रॅवीटी अँड मँग्नेटीक सर्वे आणि ड्रील या वैज्ञानिक पद्धतीने हा सर्व्हे केला गेला.

हेही वाचा : वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाची घोषणा हवेतच; प्रशासकीय‎ मान्यतेला मुहूर्त सापडेना

चंद्रपूर ब्लॉक घेण्यासाठी ओएनजीसी तेल कंपनीने इच्छा व्यक्त केली आहे, नुकतेच पास झालेल्या बिलमध्ये वने-पर्यावरण कायद्यात आता सर्वेक्षण करण्याची परवानगीची अट शिथिल झाली असल्याने पुन्हा सविस्तर सर्वेक्षण केले जाईल. सिरोंचा ब्लॉक- सिरोंचा ब्लॉक हा गोंडपिंपरी तालुक्यापासून सिरोंचा आणि तेलंगणा क्षेत्रात येत असून त्याची व्याप्ती ७०९ वर्ग किमी परिसरात असून त्यात ४७ बिलियन क्युबिक मीटर एवढे साठे आहेत. अस्वरापेठा ब्लॉक (तेलंगाना) यातील अस्वरापेठ हा ३८० वर्ग/किमी चा ब्लॉक मिथेनच्या साठ्याने भरलेला असल्याने त्याची बोली लागली असून तो ब्लॉक कोल्गेस मार्ट लिमिटेडला दिला आहे.