विद्यार्थ्यांना मेट्रोभाड्यामध्ये ३० टक्के सवलत दिल्यानंतर आता महामेट्रोने सर्वप्रवाशांसाठी आणखी एका योजना जाहीर केली आहे. त्यानुसार २५ फेब्रुवारीपासून १०० रुपयात ‘डेली पास’ घेऊन एक दिवस मेट्रोच्या सर्व मार्गिकांवरून अमर्यादित प्रवास करता येणार आहे.एका पासवर ए कच व्यक्ती प्रवास करू शकेल हे येथे उल्लेखनीय.
हेही वाचा >>>चंद्रपूर: टॅब वाटप, एकाच वेळी ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी आल्याने गोंधळ
डेली पास मेट्रोस्थानकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवासी संख्या वाढल्यावर मेट्रोने तिकीट दरात घसघशीत वाढ केली होती. त्यामुळे प्रवासी संख्या कमी झाली होती. त्यानंतर महामेट्रोने विद्यार्थ्यांसाठी तिकीट दरात ३० टक्के सवलत दिली. आता ‘डेली पास’ची योजना जाहीर केली. त्यानुसार एका व्यक्तीने शंभर रुपयाची पास खरेदी केली तर तो एक दिवस मेट्रोच्या सर्व मर्गाने कितीही वेळा प्रवास करू शकेल. त्याचा फायदा रोज एकाटोकाहून दुसऱ्या टोकाला जाणाऱ्याना किवा दिवसातून अनेक वेळा मेट्रोने एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्यांना होऊ शकतो. विशेषत: सेंट्रल एव्हेन्यूवरील व्यापाऱ्यांना याचा अधिक फायदा होऊ शकतो. त्यांना अनेकदा एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागते. शिवाय तिकीट खरेदीसाठी प्रत्येक वेळी रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही,असा दावा महामेट्रोने केला आहे.