अकोला: राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन गट पडल्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. आपले समर्थन दर्शवण्यासाठी कार्यकर्त्यांकडून नवनवीन क्लुप्त्या शोधल्या जात आहेत. अकोला शहरातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे महानगराध्यक्ष अनिल मालगे यांनी अनोख्या पद्धतीने अजित पवारांना समर्थन दिले. अनिल मालगे यांनी आपल्या दुचाकीवर अजित पवारांच्या समर्थनाचे मोठे छायाचित्र लावून ते शहरात फिरत आहेत. त्यांच्या या कृतीची शहरात चांगलीच चर्चा होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनिल मालगे हे गेल्या अनेक वर्षांपासून सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांच्यावर ओबीसी सेलच्या महानगर अध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. अजित पवार यांचे सुरुवातीपासूनच ते कट्टर समर्थक राहिलेले आहेत. अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना समर्थन देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा… चंद्रपूर : “निवडणुकीच्या तयारीला लागा”, वडेट्टीवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले, “खासदार, आमदार मी निवडून आणतो…”

दुचाकीवर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अमोल मिटकरी, माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर यांच्यासह स्थानिक नेत्यांचे छायाचित्र असलेला एक मोठा फलक अनिल मालगे यांनी दुचाकीवर समोर लावून अनोख्या पद्धतीने आपले समर्थन दर्शवले आहे. त्यांची ही कृती चर्चेचा विषय ठरत आहे.