नागपूर : जगभरातील विमानतळांना सेवा देणाऱ्या आयटी कंपनीच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे देश-विदेशातील विमानाच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.

मायक्रोसॉफ्ट या आयटी कंपनीचा सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे जगभरातील विमानतळाचे काम ठप्प झाले आहे. भारतातील नागपूर, मुंबई, दिल्ली, बंगळुरू, आणि कोलकाता मुंबईतील विमानतळावरील कामांना मोठा फटका बसला आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरूहून नागपूरला येणाऱ्या आणि नागपूरहून त्या शहराकडे जाणारी इंडिगोची विमाने शुक्रवारी रद्द करण्यात आली. त्यामुळे नागपूर आणि विदर्भातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्यांचा नियोजित कामे खोळबल्याचे चित्र होते.

accident on flyover in Nashik, Four people died accident Nashik,
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Gold, charas, ganja, Mumbai airport,
मुंबई विमानतळावर सोने, चरस, गांजा जप्त
mumbai sindhudurg air plane
मुंबई – सिंधुदुर्ग विमानसेवा दोन महिने बंद
Nagpur airport loksatta news
नागपूर विमानतळ विस्तार, प्रशासन मिशन मोडवर
yard remodeling trains
नागपूर : यार्ड रि-मॉडेलिंगसाठी दिल्ली मार्गावरील काही रेल्वेगाड्या रद्द
tibetean plateau
तिबेटच्या पठारावरून विमाने का जात नाहीत? वैमानिकांच्या भीतीचे कारण काय?
Aviation students career
निवडणूक होताच सरकारला आश्वासनाचा विसर…वैमानिक प्रशिक्षणार्थींसमोर मोठे संकट…

हेही वाचा : चंद्रपूर: दोन बछड्यांसह मादी बिबटचा गावात धुमाकूळ; घरात मांडले ठाण, सहा जणांना…

सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने इंडिगोने ६ई-६२६५ दिल्ली-नागपूर आणि ६ई-६५७३ नागपूर-दिल्ली, ६ई-८०४ मुंबई- नागपूर, ६ई-८०६ नागपूर-मुंबई, ६ई-४८६ बंगळुरू-नागपूर, ६ई-६८०३ नागपूर-बंगळुरू, ६ई-६३७६ दिल्ली-नागपूर आणि ६ई-६३८४ नागपूर-दिल्ली अशी आठ विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले.

भारतात इंडिगो एअरलाईन्स देशांतर्गंत सेवा देणारी सर्वांत मोठी कंपनी आहे. या कंपनीला सर्व्हर बिघाडाचा सर्वांधिक फटका बसला आहे. या शिवाय स्पाइसजेट या परवडणाऱ्या एअरलाईन्सलाही तांत्रिक समस्येचा फटका बसला आहे. आमची टीम या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे, असे स्पाइसजेटकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : राज्यात लवकरच १२ वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्र, निम्मी वाहने…

फक्त विमानतळच नाही तर विविध क्षेत्रातील व्यवसाय, बँक, टेलिकॉम कंपन्या, टीव्ही आणि रेडिओ ब्रॉडकास्ट सेवांना विंडोजच्या ब्लू स्क्रिन एरररचा सामना करावा लागत आहे. विंडोजची ऑपरेटिंग सिस्टिम बंद झाल्यामुळे यावर अवलंबून असलेले सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत.

मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रत्येक विमानाला सरासरी ५१ मिनिटांचा उशीर लागत आहे. तर दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जवळपास ४० मिनिटांचा उशीर लागत आहे. दरम्यान एअर इंडियाने सांगितले की, मायक्रोसॉफ्टच्या समस्येमुळे त्यांच्या सेवेत तात्पुरत्या काळापुरता व्यत्यय आला होता.

हेही वाचा : Amravati update : आधी दुचाकीने धडक, नंतर चाकूने भोसकून हत्‍या…

मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरातील वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरात बँकांपासून विमान वाहतुकीपर्यंतच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. जगभरातील अनेक वापरकर्त्यांच्या विंडो सिस्टिमवर निळ्या रंगाची स्क्रीन दिसत आहे. युजर्सच्या कॉम्प्युटर आणि लॅपटॉपवर अचानक ब्लू स्क्रीन दिसू लागल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे.

भारतीय वेळेनुसार दुपारी साधारण १२.३० दरम्यान मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर ठप्प झाला. विमान प्रवासाचे बुकिंग आणि चेक-इन सेवा बंद झाल्यामुळे एअर इंडिया, इंडिगो, आकसा एअरलाईन्स आणि स्पाइसजेटची सेवा खंडीत झाली आहे.

Story img Loader