चंद्रपूर : येथील बाबुपेठ व लालपेठ परिसरात रविवारी रात्री ९ वाजून ३१ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. ‘वोल्कॅनो डिस्कवरी डॉट कॉम’ या संस्थेच्या संकेतस्थळावर भूकंपाची तिव्रता एक मॅग्नेट्यूडपेक्षा अधिक दर्शवण्यात आली आहे. भूपृष्ठापासून दहा किलोमीटरच्या खोलीत भूकंप घडून आल्याची नोंद आहे. परंतु, ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी’ या भारतातील अधिकृत संकेतस्थळावर याबाबत कोणतीही माहिती वृत्तलिहिस्तोवर देण्यात आलेली नव्हती. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा