अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, अचलपूर आणि अंजनगाव सूर्जी तालुक्यातील अनेक भागांत आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अनेक गावांमध्ये भूकंपाचे हादरे बसले. यामुळे काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

हेही वाचा – ऐन नवरात्राच्या तोंडावर सोन्याच्या दरात बदल… आता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅम…

Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Malkapur, Chainsukh Sancheti, Rajesh Ekde,
मलकापुरात विकासकामांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी, चैनसुख संचेती आणि राजेश एकडेंमध्ये कलगीतुरा
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
Maharashtra rain updates
Maharashtra Rain News: दक्षिण महाराष्ट्राला बिगर मोसमी पावसाचा फटका, आणखी दोन दिवस पावसाचा जोर
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
Thieves run away carrying bullets by pretending to take test drive in Kondhwa
रपेट मारण्याची बतावणी; बुलेट घेऊन चोरटा पसार, कोंढवा भागातील घटना

हेही वाचा – नागपूर:‘लोकसभा’ जिंकण्यासाठी गडकरींनी केला होता ‘हा’ नवस…

मेळघाटचा काही भाग, आमझरी, सातपुड्याच्या पायथ्याचा भाग, चिखलदरा, धारणी तालुक्यातील अनेक भागांत हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.२ इतकी नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. जिल्हा प्रशासनाकडून अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली नसली, तरी अनेक गावांमध्ये या भूकंपाचे हादरे जाणवल्याची माहिती गावकऱ्यांनी दिले आहे. भूकंपामुळे हानी झाल्याचे वृत्त अद्याप हाती आलेले नाही.