नागपूर : शहरात गेल्या काही वर्षांत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरात लाखभर कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू असून गेल्या वर्षभरात ६ हजार ८०६ नागरिकांना त्यांनी चावा घेतला आहे. यात भटक्या व तसेच काही पाळीव कुत्र्यांचाही समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहराचा वाढता विस्तार, कुठेही टाकला जाणारा कचरा यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर झाली आहे. या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आहे. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून नसबंदी व लसीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. ही कुत्री विशेषत: रात्रीच्यावेळी वाहनांच्या मागे धावत असल्यामुळे नागरिकांना वाहन चालवणे कठीण झाले आहे. २०१९ मध्ये नसबंदी अभियान राबवण्यात आले होते. मात्र त्यानंतर हे अभियान बंद करण्यात आले.

आधी तक्रार आल्यास आरोग्य निरीक्षक संबंधित भागातून कुत्री पकडून त्यांना जवळच्या केंद्रात दाखल करत होते. तेथे त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याबरोबरच अँटी रेबीज लसही दिली जात होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे काम बंद आहे. त्यामुळे शहरात कुत्र्यांची संख्या वाढली आहे.

भटक्या कुत्र्यांबरोबरच नागरिकांनी हौस म्हणून पाळलेल्या कुत्र्यांकडूनही चावा घेतल्याच्या घटना वाढत आहेत. कुत्र्यांनी चावा घेतल्याची सर्वाधिक ३ हजार ५५६ प्रकरणे महालातील आहेत. त्यानंतर १७४४ प्रकरणे सदर भागातील आहेत. मार्च २०२२ मध्ये सर्वाधिक ८१७ लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला. भटकी कुत्री चावण्याचे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढले आहे. २०२१ मध्ये ४ हजार ५८५ तर २०२२ मार्चपर्यंत २ हजार २२१ लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला.

महापालिकेत कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून ती बंद आहे. नियमानुसार भटक्या कुत्र्यांवर नसबंदी करून त्यांनी मूळ जागी सोडण्यात येईल.

– डॉ. गजेंद्र महल्ले, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका.