नागपूर : दीक्षाभूमीवर दरवर्षी धम्मचक्र दिन सोहळाच्या निमित्ताने लाखोंचा भीमसागर उसळतो. धम्मचक्र दिन सोहच्याचे वैशिष्ट म्हणजे येथे मोठ्या प्रमाणात होणारी पुस्तकविक्री. यंदाही धम्मचक्र दिनानिमित्त दीक्षाभूमी परिसरात दोन दिवसात कोट्यावधींच्या रुपयांच्या पुुस्तकांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, दीक्षाभूमीमध्ये तीनशेच्यावर पुस्तकांची दुकाने लागलेली आहे.
यामध्ये मोठ्या प्रमाणात आंबेडकरी आणि बौद्ध साहित्यांची विक्री होते. दीक्षाभूमीवर येणारा प्रत्येक अनुयायी किमान एक तरी पुस्तक आपल्याबरोबर नेतो. बाबासाहेबांना वैचारिक अभिवादन या भावनेतून हजारोंच्या संख्येत पुस्तकांची विक्री होते. दीक्षाभूमीवरील एका पुस्तक विक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार, दीक्षाभूमीवर सर्वाधिक मागणी ‘भारताचे संविधान’ आणि ‘भगवान बुद्ध व त्यांचा धम्म’ या पुस्तकांना आहे. याशिवाय महात्मा फुले, बिरसा मुंडा, शाहू महाराज यांच्यावर आधारित पुस्तकांनाही मोठ्या प्रमाणात मागणी असते.