अनेक पर्यावरणस्नेही पार्क व्हावे हीच ‘वेकोली’ची इच्छा!
जेव्हा कोणत्या नव्या विचारांचा जन्म होतो तेव्हा त्यापासून होणारे परिणाम सकारात्मक्तेचे दर्शन देऊन जातात. असेच पाऊल पडले अन् ‘इको फ्रेंडली माईन टुरिझम सíकट’सारख्या अद्भूत उपक्रमाचा जन्म झाला. पर्यावरणाला पोषक असा हा ‘इको फ्रेंडली माईन टुरिझम सíकट’ वेस्टर्न कोल फिल्ड सावनेरच्या खाणीनजीक तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा पार्क देशातील पहिला ‘इको फ्रेंडली माईन टुरिझम सíकट’ म्हणून आता ओळखला जात आहे. कोळसा खाण आणि त्या परिसरातील नागरिक व कामगारांचे जीवनमान तसे खडतरच, त्यामुळे नेहमीच हा भाग दुर्लक्षित. नागपूर जिल्ह्यातील कोळसा खाणी व तेथील परिसरही त्याला अपवाद नाही. मात्र, या पार्कच्या निमित्ताने का होईना आता या भागात पर्यटकांची रेलचेल वाढली आहे अन् तेथील नागरिकांचेही जीवनमान बदलण्याचे संकेत मिळत आहेत.
तब्बल सहा एकरात माईन टुरिझम सíकट साकारण्यात आले असून देशातील हे पहिलेच सर्वोकृष्ट ‘इको फ्रेंडली माईन टुरिझम सíकट’ म्हणून आता नावारूपाला येत आहे. पार्कमध्ये घनदाट झाडी असून त्यात दीड एकरात हिरवळ लावण्यात आली आहे. देशी झाडांचे व फुलांचे शेकडो प्रकार येथे बघायला मिळतील. वेकोलि सावनेरच्या भल्या मोठय़ा खाणींमध्ये जे पाणी साचते त्याचा उपयोग या उद्यानाची हिरवळ कायम ठेवण्यासाठी केला जातो. सामान्यपणे कोळसा खाणीपासून दूरच बरे, असे म्हणणारे आता आपसूकच या उद्यानाकडे वळत आहेत. आतापर्यंत तब्बल १० हजार पर्यटकांनी या उद्यानाला भेटी दिल्या आहेत. एवढेच नाही तर पंतप्रधान मोदींनीही आपल्या १८ व्या ‘मन की बात’मध्ये या ‘इको फ्रेंडली माईन टुरिझम सíकट’चा उल्लेख केला. सर्वसामान्यांना कोळसा खाणी जाण्यास मनाई असते, त्यामुळे येथे नेमके काय घडते, याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. नेमके हेच हेरून येथे भूमिगत ‘माईन मॉडेल’ तयार करण्यात आले आहे. यात शिरताच तुम्हाला खाणीत शिरल्याचा अनुभव येतो अन् तेथील कार्याची माहिती मिळते. शिवाय, उद्यानात फिरण्यासाठी ३०० मिटरचा जॉिगग ट्रॅक करण्यात आला आहे. लहान मुलांना मनोरंजनासाठी नॅरो गेज ‘टॉय ट्रेने’च्या सवारीचा आनंद येथे घेता येतो. या परिसरातच ‘इटरी’ हाऊस अर्थात, कँटीनची व्यवस्था आहे. दिनेश मिर्झापूरे यांनी या पार्कचे डिझाईन तयार केले असून लॅण्डस्केपमधून सुंदर इको फ्रेन्डली निर्मिती केली आहे. यापुढे देशात जेथे कुठे अशा निर्जीव खाणींजवळा पडित जमिनी आहेत तेथे ‘इको फ्रेंन्डली माईन टुरिझम सíकट’ला प्राध्यान्य देण्यात येणार असल्याची महिती सूत्रांनी दिली. याच महिन्यात केंद्राचे व राज्याचे मंत्री या पार्कला भेटी देणार असल्याचीही माहिती आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी असे अनेक पार्क व्हावे, हीच वेकोलिची इच्छा असल्याचे सध्या तरी दिसत आहे.
२९० किलोचा दगडी चेंडू
‘इको फ्रेंन्डली माईन टूरिझम सíकट’मध्ये विविध प्रकारचे पाण्याचे फवारे आणि दगडी शिल्प लावण्यात आली आहेत. वैज्ञानिक दृष्टीने काही फवारे येथे उभारव्यात आले आहेत, तर उद्यानातील २९० किलो वजनाचे गोल दगडी चेंडूचे शिल्प सर्वाना आकर्षति करते. केवळ पाण्याच्या धारेवर हा २९० किलोचा दगडी चेंडू अगदी अलगद फिरतो. यात वैज्ञानिक कौशल्याचा आधार घेतला आहे.
पूर्वी ‘इको फ्रेंन्डली माईन टुरिझम सíकट’ बघण्यासाठी विदेशात जावे लगत असे. मात्र, वेकोलिच्या पुढाकाराने आता आपल्या देशातच पहिला असा पार्क तयार करण्यात आला आहे. ही एक मोठी उपलब्धी आहे. विदर्भासाठी हे उद्यान गौरवास्पद बाब आहे. प्रदूषणावर नियंत्रण अन् पर्यटनाला चालना देणारा हा उपक्रम आहे.
– आशिष टायल, माहिती व जनसंपर्क अधिकारी, वेकोलि, नागपूर</strong>