बुलढाणा : जिल्ह्यातील पीक नुकसान पाहणीच्या आपल्या धावत्या दौऱ्याच्या समारोपात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडविली! सोमवारी बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथे कृषिमंत्री सत्तार यांनी प्रसिद्धी माध्यमांसोबत धावता संवाद साधला.
‘प्रभू रामचंद्र शिंदे गटाच्या नेत्यांना आशीर्वाद देणार नाही’, या संजय राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता कृषिमंत्री म्हणाले की, ‘‘त्यांचं डोकं फिरलं आहे. प्रभू रामचंद्र राऊतांना विचारून आशीर्वाद देतील का?
हेही वाचा – यवतमाळ: कारमधून आले अन् चाकूचा धाक दाखवून २५ टन साखरेचा ट्रकच घेऊन गेले…
सिल्लोड येथील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अधिक काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. यावेळी खासदार प्रतापराव जाधव उपस्थित होते. तत्पूर्वी, कोलवड येथे आगमन झाल्यावर त्यांनी वादळी, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधत, सरकार बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही दिली. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्यात येईल, असा दिलासा त्यांनी दिला.