नागपूर : मागील १२ वर्षांपासून रखडलेल्या प्राध्यापक भरतीमुळे असलेल्या रिक्त पदांचा आणि उच्च शिक्षणाचा डोलारा आपल्या खांद्यावर समर्थपणे सांभाळणाऱ्या तासिका प्राध्यापकांना मासिक वेतन द्यावे, असे निर्देश असतानाही प्राचार्यांनी केराची टोपली दाखवली आहे. ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केलेल्या बातमीची तत्काळ दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वीच करावे, असे निर्देश आढावा बैठकीत दिले.

हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

हेही वाचा : विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

तासिका प्राध्यापकांना संपलेल्या शैक्षणिक सत्रापर्यंत संपूर्ण वर्षाचे मानधन एकाच वेळी शैक्षणिक सत्र संपल्यानंतर केव्हातरी एकदा मिळते. मात्र, मानधन केव्हा मिळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्षातील ही चिंताजनक बाब लक्षात घेऊन शिक्षण संचालकांनी शिक्षण सहसंचालकांना तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मासिक वेतन मिळण्यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले. असे असताना मासिक वेतनाबाबत प्राचार्यांकडून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

हेही वाचा : तासिका प्राध्यपकांच्या वेतनाच्या पत्राला महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दाखविली केराची टोपली

दिवाळी सण आता काही दिवसावर आला असताना मासिक वेतनासंदर्भात प्राचार्यांकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी याची दखल घेतली आहे. मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीमध्ये दिवाळीपूर्वी तासिका प्राध्यापकांचे मानधन द्या, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

Story img Loader