नागपूर : विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री अनिल देशमुख यांनी माझ्या विरोधात अहेरीतून लढावे. मला अजित पवार यांनी आदेश दिले तर ते ज्या मतदार संघातून लढतील त्यांच्या विरोधात लढण्यास मी तयार आहे. फडणवीस यांच्या विरोधात त्यांनी लढू नये, लढल्यास त्यांची जमानत जप्त होईल, अशी टीका राज्याचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी येथे केली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
धर्मरावबाबा आत्राम नागपुरात वृत्त वाहिनीच्या प्रतिनिधींशी बोलत होते. विधानसभा निवडणुकीत कोणी कुठून लढावे यासाठी विविध पक्षाच्या श्रेष्ठीकडून ठरविले जाते. अनिल देशमुख यांनी दक्षिण- पश्चिम नागपूर मतदार संघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढण्यापेक्षा त्यांनी माझ्या विरोधात अहेरीतून लढावे . मी भीत नाही, माझा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उमेदवार दिला तरी मी लढणार आहे. देवेंद्र फ़डणवीस यांच्या विरोधात लढले तर त्यांना त्यांचाच पक्षाची मते मिळणार नाही, अशी टीका आत्राम यांनी केली.जयंतराव पाटील माझा संपर्कात आहे, ते महायुतीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहे असेही आत्राम म्हणाले.
हेही वाचा >>>रोहित पवारांनी घेतली गडकरींची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यात सगळीकडे पाठिंबा मिळत असताना महाविकास आघाडीच्या पोटात दुखू लागले आहे. ही योजना बंद होणार म्हणून अपप्रचार सुरू केला आहे. मात्र महिलांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. आतापर्यंत महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये पोहचले आहे. त्यांच्या परिणाम म्हणून सरकारवर आता त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे या योजनेत महिलांचा सहभाग वाढला आहे. विरोधी पक्षातील ज्या महिला या योजनेबाबत ओरड करत आहे त्यांनी सुद्धा या योजनेत अर्ज भरले आहे, असेही आत्राम म्हणाले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत ३१ ऑगस्टला दुसरा हप्ता वाटप होईल. नागपुरात लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होईल.
महायुतीमध्ये प्रत्येक पक्ष सर्व्हेचा आधार घेत उमेदवारांची चाचपणी करत आहे. लोकांची मत जाणून घेतले जाते. लाडकी बहीण, लाडका भाऊ ही योजना राबवली जात आहे. दिव्यांगाना साहित्य वाटप होत आहे. त्यामुळे महायुतीला मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद बघता विरोधी पक्षातील लोक आता बॅकफूटवर गेले आहे, अशी टीका त्यांनी केली.
आदिवासी विभागाचे हजार कोटी वळते केले, असा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला असला तरी त्यांनी तथ्य जाणून घेतले पाहिजे. निधी ९ टक्के आदिवासीवर खर्च करावा अशी तरतूद आहे, शेड्युलकास्ट साठी १३ टक्के ठेवण्यात आले आहे. आदिवासीसाठी असलेल्या निधी हा लाडकी बहिणीसाठी खर्च केला नसल्याचे आत्राम म्हणाले.