गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून धनगरांना अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याला आदिवासींनी विरोध दर्शवला आहे. अशातच, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनीदेखील धनगरांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण दिल्यास आपण मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा देणार, असा इशारा दिला आहे.

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातून धनगरांना आरक्षण द्यावे, यासाठी धनगर नेते आग्रही आहेत. परंतु आदिवासींचा त्यांचा या मागणीला विरोध आहे. धनगर समाजाने आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभ्यास करण्यासाठी समितीची घोषणा केली होती.

ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Religion shouldnt justify reservation
इथे मुद्दा मुस्लिमांच्या लांगूलचालनाचा नसून, आरक्षणाच्या निकषांचा आहे…
Manoj Jarange On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर…”, मनोज जरांगेंची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…

हेही वाचा >>> सचिन तेंडुलकर पोहे खाण्यासाठी नितीन गडकरींकडे येणार, त्यानंतर…

अनुसूचित जमाती समाविष्ट धनगड आणि धनगर हे एकच आहे, असाही दावा धनगर नेत्यांकडून करण्यात आला होता. यावर समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही. परंतु राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता लवकरच यावर निर्णय होऊ शकतो. त्यामुळे सर्वपक्षीय आदिवासी समजातील नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. आदिवासी समाजात असलेला तीव्र विरोध पाहता अनुसूचित जमाती प्रवर्गातून धनगरांना आरक्षण देण्याय येऊ नये, अशी त्यांची मागणी आहे.

हेही वाचा >>> Video: येता संकट धैर्य, शौर्यासह लढली माझी आई….! पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी वाघापुढे उभे ठाकले अस्वल

यावर अनुसूचित जमातीसाठी राखीव अहेरी विधानसभेचे आमदार तसेच राज्याचे अन्न व औषध मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आक्रमक भूमिका घेतली असून धनगरांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण दिल्यास आपण पदाचा राजीनामा देणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.

सर्वपक्षीय आदिवासी नेत्यांचा विरोध

धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून (एसटी) आरक्षण देण्याच्या विरोधात सर्वपक्षीय आमदारांनी एकजूट दाखवली आहे. आदिवासी समाजाला अडचणीत आणणे आणि धगनर समाजाची दिशाभूल करण्याचा प्रकार सरकारने बंद करावा, अन्यथा २५ आमदार आणि चार खासदार राजीनामे देऊन समाजासाठी रस्त्यावर उतरतील, असा इशारा विक्रमगडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार सुनील भुसारा यांनी दिला होता. मुख्यमंत्र्यांनी यावर बैठक घेऊन आश्वासक तोडगा काढावा, अशी त्यांची मागणी आहे. आता सरकारमध्ये मंत्री असलेले धर्मरावबाबा आत्राम यांनीदेखील आक्रमक भूमिका घेतल्याने धनगर आरक्षणाचा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

Story img Loader