लोकसत्ता टीम
नागपूर – नक्षलवाद्याकडून मला धमक्या येण्याची ही पाचवी वेळ आहे. याचा लेखाजोखा गृह विभागाकडे आहे. मी लोकांसाठी काम करीतच राहणार असून माझी सुरक्षा मी स्वतः करीत आहे, असे अन्न व औषधी विभागाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.
आणखी वाचा-मराठ्यांना कुणबी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध; ओबीसी महामोर्चात एल्गार
ते नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यानी एवढ्यात तीन जणांची हत्या केली. खाण उद्योगाव्दारे जिल्ह्याचा विकास करण्याच्या प्रयत्नाला नक्षलवाद्यांचा विरोध आहे. ते त्यांचे काम करत आहे. आम्ही लोकांची कामे करतो. असे आत्राम म्हणाले. ओबीसीसह कोणाच्या आरक्षणाला धक्का लागू न देता मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. राज्य सरकार योग्य विचार करेल आणि सगळ्यांना घेऊन चालण्याचे काम महायुतीचे सरकार करणार असल्याचे आत्राम म्हणाले.