लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : जालनामध्ये घडलेली घटना दुर्देवी असली तरी या सगळ्या घटनेमागे कोण आहे याची मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून लवकरच हे आंदोलन कोणी घडवून आणले आहे ते समोर येईल. त्यामुळे विरोधी पक्षाच्या या घटनेवर राजकारण न करता मराठा आरक्षण कसे देता येईल त्या दृष्टीने विचार केला पाहिजे असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केले.

धर्मरावबाबा आत्राम प्रसार माध्यमांशी बोलत होते. पक्ष मजबूत करण्यासाठी विदर्भात आम्ही मेळावा घेत आहोत. आगामी निवडणुकीत महायुती आणि राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. अजित पवार सुद्धा विदर्भात लवकरच विभागीय पातळी मेळावे घेणार आहे. गणेश चतुर्थी, नवरात्र आदी सणासुदीचे दिवस असताना तेलामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे. भेसळीचे प्रकार थांबले पाहिजे यासाठी कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहे. लवकरच कडक कारवाई करणार आहोत. नागपुरात या संदर्भात मोठ्या प्रमाणात भेसळ तयार त्त्याचा शोध घेतला जात आहे. सुगंधी तंबाखू असो की तेलात भेसळ असेल आम्ही अन्न प्रशासन विभागाच्या माध्यमातून कारवाई करणार आहे.

आणखी वाचा-“जालना लाठीचार्जसारख्या संवेदनशील मुद्याचे राजकारण करून….” चित्रा वाघ यांची महाविकास आघाडीवर टीका, म्हणाल्या…

शरद पवार सध्या प्रत्येक जिल्ह्यात सभा घेत आहे, माझ्या जिल्ह्यात आले तर त्यांचे स्वागत करू. त्यांचा आशीर्वाद राहणारच आहे, त्यांचे काम ते करतात, आमचे काम आम्ही करणार आहे. अजित पवार यांच्या मागे महायुतीची ताकद आम्ही उभे करणार आहे. विदर्भात दहा जागा असून कोणत्या जागा कोणाच्या वाट्याला येणार याबाबचा निर्णय महायुती घेईल मात्र उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्ष मजबूत व बळकट करणार असल्याचे आत्राम यांनी सांगितले.