बुलढाणा: केंद्र शासनाने सहकारला बळकटी देण्यासाठी नवीन कायदा आणला आहे. डीबीटी योजनेतून १५० प्रकारच्या सेवा देण्याचे काम करण्यात येणार आहे. सहकार मंत्री दिलिप वळसे पाटील यांनी येथे ही माहिती दिली. शेतकऱ्यांचा कर्जपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी संस्था अवसायनात काढू नये असे निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात अमरावती महसूल विभागातील सहकार विभागाची बैठक आज गुरुवारी पार पडली. यावेळी ना. वळसे यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयस्तरावर आढावा बैठक घेण्यात येईल. यात सर्व प्रश्न जाणून अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे ते म्हणाले.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra assembly elections
२०१९ च्या त्या बैठकीत काय घडलं? कथित सत्तांतर घडवणारी बैठक कधी, केव्हा, कुठे झाली होती?
Amol Kolhe on Devendra Fadnavis
Amol Kolhe: “…याचा अर्थ महायुतीचे सरकारच येणार नाही”, देवेंद्र फडणवीसांचे नाव घेत अमोल कोल्हेंची सूचक टिप्पणी!
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई

हेही वाचा… तब्बल एक ‘तपा’नंतर गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्राला मंजुरी; कसे असेल स्वरूप? जाणून घ्या…

अपुऱ्या पतपुरवठ्यामुळे शेतकरी आत्महत्या पालकमंत्री म्हणाले, विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गंभीर आहे. वेळीच कर्जपुरवठा न झाल्यास शेतकरी ज्यादा व्याजदराने कर्ज घेतो. परतफेड करण्यास असमर्थ ठरल्यास शेतकरी आत्महत्येसारखे पाऊल उचलतात. हे दुष्टचक्र बदल ण्यासाठी सावकारी कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सहकार मंत्र्यानी केले. बैठकीला आमदार सर्वश्री राजेंद्र शिंगणे, आकाश फुंडकर, अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी किरण पाटील, विभागीय सहनिबंधक विनायक कहाळेकर उपस्थित होते.