वाशीम : राज्य मंत्री मंडळातील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे नेहमीच बिनधास्त बोलतात. आजही त्याचा प्रत्यय आला. मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील जाहीर सभेत पाणीपुरवठा मंत्री गुलाब पाटील यांनी संजय राठोड यांचे तोंड भरून कौतुक केले. तसेच त्यांची ईच्छा पूर्ण व्हावी असेही ते म्हणाले.
आज श्री संत सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्त पोहरादेवी येथे जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, खासदार श्रीकांत शिंदे, महंत व इतर मान्यवर उपस्थित होते. गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राठोड यांच्यामुळे संत सेवालाल महाराजांचे दर्शन घेतले आता विरोधकांपासून थंडी वाजणार नाही. सरकार निवडून आणण्याची ताकद बंजारा समाजात आहे. संजय राठोड माझा वीस वर्षांपासूनचा मित्र आहे. ये प्यार का वादा है ! आय लव्ह यु फिफ्टी-फिफ्टी म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांना साद दिली.
हेही वाचा – फडणवीसांच्या ऊर्जा खात्याविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार, ‘ही’ आहे कारणे
हेही वाचा – अवकाळी पाऊस पुन्हा परतला, ‘या’ शहरात मोठे नुकसान…
महाराष्ट्रामध्ये जर सर्वात हुशार मंत्री कोण असेल तर संजय राठोड आहे. मुख्यमंत्री यांच्यावर काय जादू टाकली काय माहीत, एकट्या पोहरादेवीसाठी सव्वासातशे कोटी रुपयांचा निधी त्यांनी आणला, असेही ते म्हणाले.