बुलढाणा : दवाखाना, मोठ्या रुग्णालयात, ‘एम्स’ मध्ये उपचार अन शस्त्रक्रियासाठी जावे लागणे हे गोरगरीब ते श्रीमंत यांच्यासाठी आनंद दायक नक्कीच नसते! मात्र रोग, गंभीर आजार यासाठी आरोग्य आस्थापनात जावे लागणे हा आयुष्यातील अटळ भाग, अपरिहार्य बाब आहे. यामुळे आरोग्यविषयक अडचणीत आलेल्यासाठी ही एक आनंद वार्ता आहे…
बुलढाण्याचे खासदार तथा देशाचे आरोग्य, आयुष्, कुटुंब कल्याण राज्यमंत्री, यांनी वरील अभिनव आणि उपयुक्त उपक्रम सुरू केला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून विक्रमी चौथ्यांदा विजय होणारे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रात राज्यमंत्री पदाची संधी मिळाली. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मतदार आणि जिल्हयातील नागरिकांच्या पाठबळ, आशीर्वाद यामुळे केंद्रात मानाचा ‘लाल दिवा’ मिळाला. आपल्या या राजकीय उपलब्धी मध्ये मतदार आणि जिल्हावासीयांचा सिंहाचा वाटा आहे,असे नामदार जाधव मानतात. यामुळे जिल्हावासीयांच्या या ऋणातून काही अंशी मुक्त होणे , उतराई होण्यासाठी नामदार प्रतापराव जाधव यांनी पुढाकार घेतला आहे.
हेही वाचा : आनंदवार्ता! रेल्वेचे सामान्य श्रेणीचे डब्बे आता वाढणार; महत्त्वपूर्ण बदलामुळे प्रवाशांना दिलासा
काय आहे योजना
देशातील कुठल्याही दवाखान्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना , रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी , उपचार घेता यावा हा योजनेचा उद्धेश आहे. या दृष्टिकोनातून केंद्रीय आरोग्य राज्य मंत्र्यांच्या बुलडाणा येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये विशेष आरोग्य कक्षाची स्थापना करण्यात आला आहे. नामदार प्रतापराव जाधव यांनी ‘लोकसत्ता’ सोबत बोलताना ही महत्व पूर्ण माहिती दिली.
हेही वाचा : Bhandara Rain News: भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी ; गोसीखुर्द धरणाची ३३ दारे उघडली…
ते म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी माझ्या कार्यावर विश्वास ठेवुन चौथ्यांदा निवडून दिले. त्यांच्याच आशीर्वादाने केंद्रामध्ये आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार असलेल मंत्रीपद आणि आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्रीपद मला मिळाल .या मंत्रिपदाचा फायदा बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांना ,रुग्णांना झाला पाहिजे हा माझा दृष्टिकोन आहे. डोळ्यासमोर ठेवून बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियम स्थित असलेल्या आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये विशेष आरोग्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे . देशभरातील आणि राज्यातील कोणत्याही दवाखान्यामध्ये , एवढेच नव्हे दिल्ली, मुंबई , हैदाबाद आणि एम्स हॉस्पीटल असेल तेथेही बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना व रुग्णांना उपचार घेता येणार आहे. त्यांच्या मदतीसाठी बुलढाणा येथील जन संपर्क कार्यालयात हा कक्ष उभारण्यात आला आहे कोणत्याही आजारातील उपचार आणि शत्रकिया संदर्भातील माहिती या कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरीकांना सहज मिळणार आहे . तसेच त्यांना उपचार आणि शस्त्रक्रिया यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आरोग्य कक्षाचे प्रमुख म्हणून राजू भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील रुग्ण आणि त्यांच्या र नातेवाईकानी या कक्षात संपर्क साधावा असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले .
त्यापूर्वी बुलढाणा येथील जिल्हा केंद्रीय बँकेच्या सभागृहात काल शुक्रवारी, १९ जुलै रोजी पार पडलेल्या सत्कार सोहळ्यात केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी या उपक्रमाचे सूतोवाच केले होते. यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी वरील तपशीलवार माहिती दिली.