गडचिरोली : आमच्या समाजात अनेक महंत आहेत. इतर समाजातही असतात. त्यामुळे कोण कुठे जातो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे,  असा टोला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी पोहोरादेवी गडावरील बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांच्या शिवसेना प्रवेशावर लगावला. ते शुक्रवारी गडचिरोली दौऱ्यावर आले असताना पत्रपरिषदेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”, नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “संघाच्या शाखेत या”

आज मुंबई येथे बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहोरादेवी येथील बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. त्यांच्या प्रवेशामुळे बंजारा समाजाचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना धक्का मानला जात होता. परंतु त्यांनी या प्रश्नावर समाजात अनेक महंत असतात, त्यामुळे आम्हाला काहीही फरक पडत नाही असे वक्तव्य केले. ते पुढे म्हणाले, बंजारा समाजात स्व. महंत रामराव महाराज यांचे सर्वोच्च स्थान आहे. त्यांच्यानंतर अनेक महंत समाजासाठी कार्य करीत आहेत. कोण कुठे जावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लोकशाहीत सर्वांनाच कुठल्याही पक्षात जाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोण कुठे जातो याने काहीही फरक पडत नाही. असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पूर्वीच्या शिवसेनेतून काही लोक वगळता जवळपास सर्वच जण बाहेर पडलेत. त्यामुळे आम्ही शिंदे गट नसून मूळ शिवसेना आहोत. तो ठाकरे गट आहे. न्यायलायातही निकाल आमच्या बाजूने लागेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister sanjay rathore reaction on banjara samaj mahant sunil maharaj joins shiv sena zws