चंद्रपूर:राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना डी.लिट. प्रदान होणे हा एका व्यक्तिचा नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव आहे. मुनगंटीवार यांना महामहीम राज्यपालांच्या हस्ते डी.लिट. प्रदान झाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी लोकप्रतिनिधी म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. विरोधी पक्षात असो की सत्तेत निरंतर शासनस्तरावर लोकाभिमूख निर्णय घेण्यापासून तर पर्यावरण संवर्धन तसेच सामाजिक क्षेत्रात देखील आपल्या कामगिरीचा ठसा त्यांनी उमटवला आहे. त्यांच्या चौफेर कामगिरीची आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाची विविध मान्यवर संस्थांनी प्रतिष्ठेचा सन्मान देऊन यापूर्वीही गौरव केला आहे. आता यात मानद डॉक्टरेटच्या (डी.लिट.) निमित्ताने यात अत्यंत महत्त्वाची भर पडली आहे.

vinoba bhave, vinoba bhave life, vinoba bhave work,
ज्ञानयोगी विनोबांचे स्मरण
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
USS Edsall, World War II
Dancing Mouse: ८१ वर्षांनंतर सापडले ‘डान्सिंग माऊस’ या दुसऱ्या महायुद्धातील युद्धनौकेचे अवशेष; इतिहास नेमकं काय सांगतो?
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
bird was happy to see the little girl
चिमुकलीला पाहून पक्षी झाला खूश; एकमेकांची करू लागले नक्कल अन् … पाहा खेळकर पक्ष्याचा VIRAL VIDEO
shaktimaan arriving soon mukesh khanna
भारताचा पहिला सुपरहीरो ‘शक्तिमान’ पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; कोण साकारणार मुख्य भूमिका? जाणून घ्या
comet Temple Tuttle, meteor shower, sky
आकाशात उल्‍कावर्षावाचे मनोहारी दृश्‍य; सज्‍ज व्‍हा…

हे ही वाचा…काँग्रेस इंग्रजांप्रमाणेच देशाला लुटण्याचा विचार करते….बंजारा समाजाविषयी सदैव अपमानजक….पोहरादेवीत पंतप्रधानांचा घणाघात….

गोंडवाना विद्यापीठाच्या ११ आणि १२ व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते बुधवारी (दि.२ ऑक्टोबर) ना. सुधीर मुनगंटीवार यांना मानद डॉक्टरेटने (डी.लिट.) सन्मानित करण्यात आले. सदैव चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असलेले मुनगंटीवार यांना हा सन्मान प्रदान होत असताना चंद्रपूरची मान देखील अभिमानाने उंचावली होती, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे.

अशी कामगिरी…

मुनगंटीवार यांनी संसदीय आयुधांचा उपयोग करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा नामविस्तार केला. वैराग्यमूर्ती गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा नामविस्तार होण्यातही मुनगंटीवार यांचा सिंहाचा वाटा आहे. पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे, यासाठी त्यांनी केलेल्या संसदीय पाठपुराव्याला मोठे प्राप्त झाले. याशिवाय वीर बाबुराव शेडमाके, संत जगनाडे महाराज, महाराष्ट्र भूषण स्व. बाबा आमटे यांच्या स्मरणार्थ डाक तिकीट प्रकाशित होण्यासाठी ना. मुनगंटीवार यांनी केलेला पाठपुरावा सर्वश्रुत आहे.

असा गौरव…

मुनगंटीवार १९९९ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले आणि पहिल्याच टर्ममध्ये उत्कृष्ट आमदार पुरस्काराने गौरविण्यात आले. साधारणतः पहिल्या टर्ममध्ये हा पुरस्कार क्वचितच मिळतो. हा पुरस्कार तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर व तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

हे ही वाचा…“देशातील तरुणांना अंमलीपदार्थ विकून काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे”, वाशिममधील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र; म्हणाले…

असे पुरस्कार

अंध कल्याण क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडतर्फे ‘जी.एल. नरडेकर मेमोरियल’ पुरस्कार
दि सीएसआर जरनलच्या वतीने ‘गुड गव्हर्नन्स’ पुरस्कार. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव
लोकमतचा ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार
नाशिकच्या दीडशे वर्षे जुन्या वाचनालय समितीकडून ‘अष्टपैलू राजकारणी’ म्हणून गौरव
४ लिम्का रेकॉर्ड, लक्षावधी दिव्यांनी ‘सियावर रामचंद्र की जय’ ही अक्षरं साकारल्याबद्दल तसेच ‘ग्रीन भारतमाता’ साकारल्याबद्दल २ गिनेस बुक ऑफ द रेकॉर्ड
विक्रमी वृक्षलागवडीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ‘मन की बात’मध्ये विशेष उल्लेख व कौतुक
सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाला देशामधील पहिला आयएसओ दर्जा

हे ही वाचा…पंतप्रधान मोदींनी घेतला नगारा वाजवण्याचा आनंद; वाशीमच्या पोहरादेवी येथे…

बेस्ट फायनान्स मिनिस्टर

वित्तमंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरीसाठी आज तक व इंडिया टुडेकडून ‘बेस्ट फायनान्स मिनिस्टर इन इंडिया’ हा पुरस्कार मुनगंटीवार यांना प्रदान करण्यात आला होता. स्व. अरुणजी जेटली यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. स्वातंत्र्यानंतर ११ हजार ९७५ कोटी महसुली आधिक्य असणारा अर्थसंकल्प त्यांनी देशाला दिला होता. देशात आजपर्यंत कोणत्याही अर्थमंत्र्याला हे शक्य झालं नव्हतं. ते सुधीर मुनगंटीवार यांनी करून दाखवलं. त्याचीच दखल घेण्यात आली होती.