नागपूर: राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदावर वर्णी लावण्यात आल्यानंतर लगेच ज्येष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे. या दोन्ही नियुक्त्यांवरून राज्यात ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या हालचाली होत असल्याची माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीत नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या प्रमुखपदी असलेले पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचीही बदली होण्याचे जवळपास निश्चित झाले असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची सेवानिवृत्ती झाल्यानंतर हे पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त होते. आयोगाचे नवीन अध्यक्ष नेमण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. तेव्हा रजनीश सेठ यांनीही अर्ज केला होता. मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या सूचनेनुसार शासनाने पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे प्रमुखपद रिक्त होताच नवे पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य पोलीस दलाचा कारभार हाती घेताच रश्मी शुक्ला या आगामी निवडणुकांचे वारे लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांना मुंबईत प्राधान्य देण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यभरातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे.

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
12 colleges in state offering acupuncture treatment for first time
राज्यात प्रथमच ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीची १२ महाविद्यालये
expectations from mahayuti
लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
cm Eknath Shindes promise to make Mumbais roads pothole free in two years vanished
मतदान यंत्रांमध्ये फेरफार नसल्याचे शपथ घेणाऱ्या विरोधकांना पटले का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल
ministerial post, west varhad, vidarbha
पश्चिम वऱ्हाडात मंत्रिपदाची कुणाला ‘लॉटरी’?

नागपूरचे नवे पोलीस आयुक्त कोण?

अमितेश कुमार यांना तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी नागपुरात झाल्यामुळे त्यांची बदली होण्याचे निश्चित समजले जात आहे. त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. त्यांच्या जागेवर नागपूरचे नवे आयुक्त म्हणून पहिल्या क्रमांकावर गृहविभागाचे मुख्य सचिव अनुपकुमार सिंह यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच राज्य राखीव दलाचे प्रमुख चिरंजिवी प्रसाद आणि राज्य वाहतूक विभागाचे अपर महासंचालक रवींद्र सिंघल यांच्या नावाचीसुद्धा चर्चा आहे.

एसीबीचे महासंचालक पद रिक्त का?

राज्य पोलीस दलात ९ पोलीस महासंचालकांची पदे मंजूर आहेत. सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) या महत्वाच्या पदासह लीगल टेक्निकल आणि सिव्हिल डिफेन्स पदे रिक्त आहेत. राजकीय दबावापोटी एसीबीचे महासंचालक पद रिक्त ठेवण्यात येत असल्याची चर्चा आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची ठाण्यात आयुक्त म्हणून वर्णी लागल्यास जयदीप सिंह यांची एसीबीच्या प्रमुख पदावर बदली होण्याची शक्यता आहे.

Story img Loader