नागपूर: नागपूरहून तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे विचाराधीन असून त्यासाठी रेल्वे प्रशासनाने नागपूर ते पुणे, नागपूर ते भोपाळ आणि नागपूर ते हैदराबाद या तीन मार्गावरील वाहतूक सर्व्हे केला आहे.

रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या नागपूर विभागाला वाहतूक सर्व्हे करण्याची सूचना केली होती. त्यानुसार नागपूर ते पुणे, हैदराबाद आणि भोपाळ या मार्गावरील वाहतूक सर्व्हे करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे नागपूर विभागाचे व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव उपस्थित होते.

Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
Vistara Completes Merger With Air India
‘विस्तारा’ नाममुद्रा इतिहासजमा; एअर इंडियामध्ये विलीनीकरण पूर्ण
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका

हेही वाचा… मुख्यमंत्र्यांकडून विधानपरिषदेत चुकीची माहिती! अमृत योजनेबाबत चंद्रपूरवासीयांचा आरोप

नागपूर ते पुणे दरम्यान रेल्वेला कायम प्रतीक्षा असते. या मार्गावर नवीन रेल्वेगाडी सुरू का करण्यात येत नाही, अशी विचारणा पांडे यांना केली असता त्यांनी वाहतूक सर्व्हेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, नागपूर-पुणे या मार्गावर नवीन गाडी सुरू करण्यास आमचे प्राधान्य आहे. मात्र, पुणे रेल्वे स्थानकावर नवीन गाड्या उभ्या करण्याची सोय नाही. त्यासाठी पर्याय शोधण्यात येत आहे.

दरम्यान, रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेवरून नागपूर ते पुणे, हैदराबाद आणि भोपाळ मार्गावरील वाहतूक सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेमध्ये या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्या, बसगाड्या, वातानुकूलित रेल्वेचे भाडे, वातानुकूलित बसचे भाडे आणि या मार्गावर रेल्वेगाड्या, बसगाड्यांना मिळणारा प्रतिसाद याबाबत सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा… गोंडवाना विद्यापीठाच्या चुकीमुळे २५० आचार्य पदवी संशोधक विद्यार्थी अडचणीत

हा सर्व्हे वंदे भारत एक्सप्रेससाठी आहे काय, असे विचारले असता वंदे भारत एक्सप्रेस आणि इतर रेल्वेगाड्यांसाठी हा सर्व्हे आहे. या मार्गावर कोणती गाडी आणि केव्हा सुरू करायाची हा निर्णय रेल्वे मंत्रालय घेईल, असेही ते म्हणाले.