नितीन पखाले
अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या एका युवकाने तेथून जामिनावर परत येताच पुन्हा त्याच मुलीस पळूवन नेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी आर्णीतील मुलीस पळवून नेल्याप्रकरणी संशयित आरोपी पुरूषोत्तम वानखडे (२३, रा.अमराईपुरा, आर्णी) याला पोलिसांनी अटक केली होती. त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान पुरूषोत्तम कारागृहातून जामिनावर बाहेर आला. त्याने पुन्हा त्याच मुलीस २८ मे रोजी पळवून नेले. बाजारात गेलेली मुलगी घरी परत न आल्याने आईने शोध घेतला.

मात्र, ती कुठेही सापडली नाही. अखेर रविवारी याप्रकरणी आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पुरुषोत्तम वानखडे याच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor girl was abducted on her release jail police arrested amy
Show comments