लोकसत्ता टीम

नागपूर : एका युवकाने दोन मैत्रिणींनी कोराडी मंदिरात दर्शनाच्या बहाण्याने नेले; पण रात्र झाल्याचे सांगून लॉजवर मुक्काम केला. दोघींनाही पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर एका मुलीवर रात्रभर बलात्कार केला.

vasai gangrape marathi news
अश्लील चित्रफितीच्या आधारे धमकावले, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
rape news kanpur
आधी मद्य पाजलं, मग मित्रांसमोर नाचायला भाग पाडत केला बलात्कार; IIT कानपूरच्या इंजिनिअर महिलेवर अत्याचार
class 6 girl school raped in Porbandar
शिक्षकाचा सहावीतल्या विद्यार्थीनीवर बलात्कार; वाच्यता केल्यास खिडकीतून फेकण्याची दिली होती धमकी
daund taluka , school girl rape contract ,
धक्कादायक! विद्यार्थिनीवर बलात्कार आणि खून करण्यासाठी विद्यार्थ्याने दिली १०० रुपयांची सुपारी
woman alleges rape after locking in home forced for religious conversion
पुणे : धर्मांतर करण्यासाठी महिलेला डांबून ठेवून बलात्कार; विमानतळ पोलिसांकडून महिलेसह तिघांना अटक
Minor girl raped by friend on Instagram crime news Mumbai news
मुंबईः इन्स्टाग्रामवरील मित्राकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; खासगी छायाचित्र नातेवाईक व परिचीत व्यक्तींना पाठवले
RG Kar rape-murder case verdict
RG Kar Rape-Murder Case : संजय रॉयला फाशीऐवजी जन्मठेप का झाली?

ही घटना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ ऑगस्टला मध्यरात्री २ ते सकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली. या प्रकरणी पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चेतन दिनेश साकेवार (२४, रा. इंदिरानगर, देवळी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आहे. तिच्या बहिणीची प्रकृती ठीक नसल्यामुळे तिच्या वर्धा येथे राहणाऱ्या काकाने मित्र आरोपी चेतन साकेवार याला तिला औषध देण्यासाठी नागपुरात पाठविले. आरोपी चेतनसोबत त्याची एक मैत्रीण होती. ती मैत्रीण आणि पीडित १६ वर्षांची अल्पवयीन नात्यात असल्यामुळे त्या एकमेकींना ओळखत होत्या.

आणखी वाचा-भंडारा : १३ वर्षांनंतर कारधा येथील अशोक टोल नाका बंद

घरी आल्यानंतर आरोपी चेतनने पीडित मुलीला कोराडी येथे दर्शनासाठी घेऊन जातो, असे तिच्या आईला सांगितले. त्यानंतर आरोपी त्याची मैत्रीण आणि पीडितेला कोराडीला घेऊन गेला. तेथे गेल्यानंतर कोराडी मंदिर बंद झाल्याचे सांगून त्याने दोघींना शहरभर फिरविले.

रात्र झाल्यानंतर घरी झोपण्यास जागा कमी पडेल, असे सांगून तो दोघींना वाठोड्याच्या एका लॉजमध्ये घेऊन गेला. सकाळी उठल्यानंतर पोटात दुखत असल्यामुळे पीडित मुलगी रडू लागली. त्यावेळी आरोपीने कोणाला काही सांगितल्यास तिच्या घरातील लोकांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी वर्धा येथे निघून गेला. काही दिवसांनी पीडित मुलीने तिच्या नात्यातील एका बहिणीला ही बाब सांगितली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीस वर्धा येथून अटक केली.

Story img Loader