१६ वर्षीय मुलाने रागाच्या भरात आपल्या व्यसनाधीन वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी जुने शहर पोलीस ठाण्यांतर्गत गंगानगर भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. छत्तीसगड येथील एक कुटुंब अकोल्यात उदरनिर्वासाठी काही महिन्यांपूर्वी आले. ते गंगानगर भागातील खुल्या जागेत वास्तव्यास आहेत. झाडू बनवून गावोगावी ते विकण्याचे काम ते करत होते.
हेही वाचा >>> नागपूर : मॉडेलिंगच्या नावावर तरुणींकडून देहव्यापार
सुनील शिकारी यांना दारूचे व्यसन होते. दारू पिऊन ते पत्नीला मारहाण करीत होते. सोमवारी रात्री त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर पुन्हा मंगळवारी दुपारी त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. दरम्यान, १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने घरातील चाकूने वडिलांवरच हल्ला केला. त्यामुळे गंभीर जखमी होऊन वडिलांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती जुने शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असून भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मृताच्या पत्नीलाही ताब्यात घेतले आहे. पतीच्या हत्येमध्ये तिची काय भूमिका होती, याचा शोध पोलीस घेत आहे. घटनेचा तपास जुने शहर पोलीस करीत आहेत.