नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील नवा गोंधळ समोर आला आहे. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे ‘एमकेसीएल’ला परीक्षेचे काम देणे अंगलट आले असून गुणपत्रिका छपाईसाठी न दिल्याने दीड वर्षांपासून मूळ गुणपत्रिकाच मिळत नसल्याचे समोर आले आहे.

उशिरा लागणारे निकाल, विना बैठक क्रमांकाने विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याच्या घटना नुकत्याच समोर आल्या. आता दीड वर्षापासून विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका मिळत नसल्याचा गोंधळ समोर आला आहे. करोना काळामध्ये विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेतल्या. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यानंतर मागील दोन सत्रांपासून ऑफलाईन परीक्षा सुरू आहेत. या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले. त्यांना पुढील वर्गात प्रवेशही मिळाला. काहींनी अंतिम वर्ष उत्तीर्ण होऊन वर्ष उलटले तरी त्यांना अद्यापही मूळ गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी दोन वर्षांआधी परीक्षेचे काम एमकेसीएल कंपनीला दिले.

education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
unemployed youth cheated under mukhyamantri yuva karya prashikshan yojana
भंडारा : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील शेकडो बेरोजगारांची फसवणूक!
state government decision 50 thousand teachers will get 20 percent subsidy increase
शिक्षकांसाठी मोठी बातमी! वेतनात २० टक्के वाढ होणार?
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
Ministry of Statistics report reveals 25 6 percent youth deprived of education employment and skills
आजचे तरुण ‘बिन’कामाचे आणि ‘ढ’?
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल

हेही वाचा >>> गडचिरोली : गर्भात मृत बाळ; आठ दिवसांपासून महिलेची शस्त्रक्रियेसाठी फरफट

कंपनीने प्रथम वर्षाच्या परीक्षेचे काम प्रातिनिधिक स्वरूपाने सुरू केले. मात्र, या कंपनीला काम देण्यास अनेकांनी विरोध केला. विद्यापीठाने काळ्या यादीत टाकलेल्या टाकलेल्या या कंपनीला डॉ. चौधरींनी पुन्हा काम दिल्याने अनेक अधिसभा सदस्यांनी विरोध केला. शेवटी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी दखल घेत काम बंद करण्याचे आदेश विद्यापीठ प्रशासनाला दिले. या कंपनीने गुणपत्रिका छपाईसाठी आवश्यक विदा देण्यास नकार दिला. त्यामुळे दीड वर्षापासून विद्यार्थी गुणपत्रिकांसाठी कधी महाविद्यालय तर कधी परीक्षा विभागाच्या पायऱ्या झिजवत आहेत.

हेही वाचा >>> नागपूर : शंभर रुपयांची लाच घेतांना वाहतूक पोलिसाची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित

कुलगुरूंच्या अट्टाहासाचा फटका

अनेकांचा विरोध झुगारून कुलगुरू डॉ. चौधरींनी ‘एमकेसीएल’ला विद्यापीठाचे काम दिले. त्यामुळे सहा महिन्यांपर्यंत अनेक परीक्षांचे निकाल जाहीर झाले नाही. त्यानंतर ‘एमकेसीएल’ने गुणपत्रिका छपाईसाठी प्रोमार्क कंपनीला विद्यार्थ्यांचा विदा न दिल्याने गुणपत्रिकांची छपाई करता आली नाही. कुलगुरूंच्या अट्टाहासाचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.

दीड वर्ष गुणपत्रिका देऊ शकत नसेल तर विद्यापीठाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे. कुलगुरूंचे चुकीचे धोरण या सर्व बाबींसाठी कारणीभूत आहे. तात्काळ गुणपत्रिका न दिल्यास आंदोलन करण्यात येईल.

– अतुल खोब्रागडे, विद्यार्थी कार्यकर्ता.

गुणपत्रिका छपाईचे काम सुरू आहे. एम.एस्सी. आणि इतर पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या गुणपत्रिका छापून झाल्या आहेत. विद्यापीठाच्या विभागांना गुणपत्रिकांचे वाटप झाले आहे. लवकरच पदवीच्या गुणपत्रिकांची छपाई सुरू होईल.

Story img Loader