नागपूर : रेल्वे प्रवाशांनी चूक केल्यास दंड भरून द्यावा लागतो तर रेल्वे प्रशासनाच्या चुकीने प्रवाशांना घडलेल्या मनस्तापाचे काय? असा सवाल केला जात आहे.

मंगळवारी रात्री टिटवाळाजवळ मुंबई-दुरान्तो एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता. यामुळे नागपूरला ही गाडी उशिरा पोहोचली. त्यानंतर देखभाल दुरुस्तीसाठी वेळ लागतो. त्यामुळे ही गाडी नागपूरहून मुंबईसाठी बुधवारी चार तास विलंबाने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, प्रवाशांना तसे कळवण्यात आले नाही. यामुळे प्रवाशांना नाहक रेल्वे स्थानकावर चार तास खोळंबून राहावे लागले.

police action against handcart pullers and auto driver for blocking roads and footpaths in dombivli
डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
new Thane railway station is being built between Thane and Mulund stations near psychiatric hospital
नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला वेग, उच्च दाब वीज वाहिनीच्या पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे आयुक्तांचे आदेश
Cyclone Feingal cleared entire state and once again state is heading towards winter
विदर्भ गारठला… गोंदिया ९.४, तर नागपूर, वर्धा १० अंश सेल्सिअस
confusion among passengers after badlapur local departing from thane replaced with csmt local train
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ; अचानक मुंबई दिशेकडे जाणारी लोकल लावल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
bus station in Kurla, commuters problem Kurla,
कुर्ल्यातील बस स्थानक बंद केल्याने प्रवाशांना पायपीट

हेही वाचा – काँग्रेस नाही आपणच लढू, वर्धा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी तर्फे हर्षवर्धन देशमुख, सुबोध मोहिते, समीर देशमुख इच्छुक

नागपूर-मुंबई दुरान्तो एक्स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा चार तास उशिराने नागपुरातून सोडण्यात येईल, असा संदेश न मिळाल्याने प्रवासी बुधवारी रात्री साडेबारा वाजेपर्यंत नागपूर स्थानकावर ताटकळत होते. रेल्वे प्रशासनाच्या या हलगर्जीपणाबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केला. १२२९० नागपूर-सीएसटीएम दुरान्तो एक्सप्रेस नागपूर स्थानकावरून नियोजित वेळी रात्री ८ वाजून ४० मिनटांनी सुटायला हवी होती. परंतु ही गाडी रात्री १२.४० वाजता सुटणार असल्याचे प्रवाशांना स्थानकावर पोहोचल्यावर कळले.

हेही वाचा – ‘बिपरजॉय’ गुजरातच्या किनारपट्टीपासून अवघ्या २०० किलोमीटर अंतरावर, ‘एवढा’ राहणार वाऱ्याचा वेग

त्याबाबत प्रशासनाला विचारणा करण्याचा प्रयत्न काही प्रवाशांनी केला असता, मुंबईहून दुरान्तो विलंबाने आल्याने नागपूरहून ही गाडी उशिरा सुटत असल्याचे उत्तर देण्यात आले. यासंदर्भातील संदेश प्रवाशांना का देण्यात आला नाही, याचे उत्तर कुणाकडेच नव्हते. प्रवासी रात्री ८ वाजतापासून नागपूर स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वर पोहोचले होते. परंतु गाडी फलाटावर आली नाही. रेल्वे प्रशासनाने गाडीच्या सुटण्याच्या वेळेत झालेल्या बदलाविषयी प्रवाशांना लघुसंदेशाद्वारे कळवणे गरजेचे होते.

Story img Loader