‘स्तनदा मातेच्या दुधाची बँक’ नवजातांसाठी संजीवनी ठरेल, असा विश्वास भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी व वनामतीच्या संचालक मिताली सेठी यांनी व्यक्त केला. लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान त्या बोलत होत्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा- नागपूर : म्हाडाच्या जागेवर खासगी सोसायटीचे भूखंड
वेळेआधीच जन्म घेणारे बाळ, जन्मत:च आईपासून दुरावलेले बाळ, वैद्यकीय समस्येमुळे आईच्या दुधापासून वंचित असणारे बाळ अशांना दुग्धरूपी अमृताची नितांत गरज असते. मात्र, अशावेळी स्तनदा मातेची सोय झाली नाही, तर आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. यासाठी मिताली सेठी यांनी उचललेल्या पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी लोकसत्ताला भेट दिली व ‘स्तनदा मातेच्या दुधाची बँक’ या विषयावर मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची अपेक्षा व्यक्त केली.
हेही वाचा- डॉ. धवनकर यांची विभागीय चौकशी कधी?
मिताली सेठी यांनी मेळघाटमध्ये असताना ‘ब्रेस्ट फिडिंग’वर काम केले आहे. त्यामुळे त्यांना या विषयाचे गांभीर्य माहिती होते. यावेळी त्यांनी यातले समज-गैरसमज, ज्ञान-अज्ञान अशा विविध पैलूंवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, अलीकडच्या काळात मातांना दूध कमी असणे, मुलांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. अशावेळी ‘स्तनदा मातेच्या दुधाची बँक’ उपयोगी ठरू शकते. प्रसूतीनंतर बाळाला दूध पाजल्यानंतरही अशा ‘स्तनदा मातेच्या दुधाची बँक’ साठी माता दूध देऊ शकते. ब्रेस्ट पंपच्या सहाय्याने हे दूध काढता येते आणि योग्य प्रक्रियेद्वारे ते साठवताही येते. आजही अनेक बालके अशी आहेत, ज्यांना या दुधाची गरज आहे. बरेचदा सुरुवातीला बाळाला स्तनपान करताना आई घाबरलेली असते. तिला योग्य पद्धत माहिती नसते. मात्र, बाळाला स्तनपान करताना आईच्या आणि बाळाच्या त्वचेचा संपर्क असणे गरजेचे आहे. त्यामुळे आईने न घाबरता प्रसन्न मनाने दूध पाजले पाहिजे. मानसिक तणावामुळे दूध येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शहरी भागात ही समस्या जास्त आहे. ग्रामीण भागात स्त्रियांना दूध अधिक येत असल्याने स्तन कडक होणे, दुखणे असे प्रकार हेतात. बऱ्याचदा या स्त्रिया हे जास्तीचे दूध काढून फेकून देतात. ‘स्तनदा मातेच्या दुधाची बँक’च्या माध्यमातून या स्त्रियांचा त्रास कमी होऊ शकतो आणि गरजू मुलांना दूधही मिळू शकते.

बाळाला दिवसाला ७५० मिलिलीटर दूध गरजेचे
एका बाळासाठी एका दिवसाला साधारण ७५० मिलिलीटर दूध लागते. मला जुळी मुले असल्याने दिवसाला दीड ते दोन लीटर दूध लागते. त्यामुळे दूध दान करण्याचा निर्णय घेतला तेव्हा या संपूर्ण गोष्टीचा आधी अभ्यास केला. शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून चांगले सहकार्य मिळाले. मात्र, या बँकेत दान करण्यात येणारे दूध हे तिथल्याच बाळांना दिले जाते. बाहेरही अशी कितीतरी मुले आहेत, ज्यांना आईच्या दुधाची गरज आहे.
व्यापक जनजागृती झाली तर चळवळ मोठी होईल
भारतातील फार कमी अशी शहरे आहेत ज्याठिकाणी अशा ‘स्तनदा मातेच्या दुधाची बँक’ आहे. किमान मोठ्या शहरात तरी त्या तयार व्हायला हव्या. त्यासाठी ‘सपोर्ट ग्रुप’ तयार व्हायला हवे. याबाबत थोडी जनजागृती झाली तर नक्कीच ही चळवळ मोठी होईल. यासाठी स्तनदा मातेच्या कुटुंबातील व्यक्तींनीसुद्धा सहकार्य करायला हवे. ही चळवळ वाढली तर अनेक बाळांचे प्राण वाचतील आणि मातेचे दूध खऱ्या अर्थाने संजीवक ठरू शकेल.
हेही वाचा- आता अनिल देशमुख यांना त्यांच्या मतदार संघात जाता येणार का?
एक लीटर आईचे दूध दान केले
आमच्या जवळच्या ह्युमन मिल्क बँकेत एक लीटर आईचे दूध दान करून मुलांचे १०० दिवस साजरे केले. दूध येत नाही हे कारण देता येत नाही. पुरवठा वाढण्यासाठी बाळाला परत स्तनावर ठेवले तर ते नक्कीच येते. दुसऱ्या स्तनातले दूध वापरले जात नसल्यास ते गोळा केले जाऊ शकते.