बुलढाणा : गेल्या २४ तासांत अवकाळी पावसाने जिल्ह्यातील अकरा तालुक्यांत संमिश्र हजेरी लावली. खामगाव तालुक्याला अवकाळीचा सर्वात मोठा फटका बसल्याचे वृत्त आहे.
हेही वाचा – अमरावती : मुलीची छेड काढणाऱ्याला हटकले; तरुणाने आईवर केला हल्ला
हेही वाचा – अमरावती: वादळी पावसाने ५२२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान; ११२ घरांची पडझड
शुक्रवारी दिवसा व रात्रीही अधूनमधून पावसाने हजेरी लावली. एका शेतकऱ्यासह सात बकऱ्यांचा बळी घेणाऱ्या पावसाने खामगाव तालुक्याला तडाखा दिला. तालुक्यात ३५.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याखालोखाल बुलढाणा २०.५ मिमी, संग्रामपूर १४.३ मिमी, चिखली १२.९ मिमी, मोताळा १७.३ मिमी, नांदुरा ११ मिमी, शेगाव ९ मिमी, देऊळगाव राजा ६ मिमी, मलकापूर २.५ व मेहकर १ मिमी या तालुक्यात पावसाने हजेरी लावली.