अकोला : मागील चार वर्षांपासून अकोला जिल्ह्यातील एकही प्रश्न लोकसभेमध्ये नाही, ही आमच्या जिल्ह्याची शोकांतिका म्हणावी की आमचाच करंटेपणा? असा प्रश्न करीत राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रवक्ते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपा खासदार संजय धोत्रेंवर निशाणा साधला आहे.

विशेष म्हणजे मिटकरी सत्तेत सहभागी असतानाही त्यांनी भाजपा खासदारांवर टीका केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जिल्ह्याचा नागरिक म्हणून आपण खंत व्यक्त केल्याचे आमदार मिटकरी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Ashish Shelar Criticise Sharad Pawar
Ashish Shelar : “शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या…”, भाजपा आमदाराची घणाघाती टीका
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया

हेही वाचा – किस बाई किस, फ्लाइंग किस! जाणून घ्या चुंबनाचा अर्थ, प्रकार, इतिहास

पश्चिम विदर्भातील अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपाचा गड म्हणून ओळखला जातो. लोकसभेच्या गेल्या चार निवडणुकांमध्ये तिरंगी लढतीत खासदार संजय धोत्रेंनी निर्विवाद दबदबा कायम ठेवला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी वर्णी लागली होती. खासदार संजय धोत्रे प्रकृती अस्वास्थामुळे सक्रिय राजकारणापासून सध्या दूर आहेत. याच मुद्द्यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करून खासदार संजय धोत्रेंवर टीका केली. अमोल मिटकरी अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. यापूर्वीच त्यांनी आपली महत्त्वाकांक्षा जाहीर केली. दरम्यान, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाऊन अमोल मिटकरी सत्तेत सहभागी झाले आहेत. भाजपासोबत खांद्याला-खांदा लावून सत्तेत असलेल्या अमोल मिटकरींनी भाजपा खासदार संजय धोत्रेंवरच टीका केल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या संदर्भात अमोल मिटकरी म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यातील कुठल्याही समस्या लोकसभेत मांडल्या गेल्या नाहीत, याची खंत असल्याने अकोला जिल्ह्यातील नागरिक या नात्याने ट्विट करून भावना व्यक्त केल्या आहेत. हे वास्तव आहे. संपूर्ण देश, राज्यातील प्रश्न संसदेच्या पटलावर येताना दिसतात. दुर्दैवाने अकोला जिल्ह्यातील प्रश्नांना लोकसभेत वाचा फुटताना दिसत नाही. याचे कारण खासदारांचे आजारपण आहे. भाजपाने दुसऱ्याला संधी द्यायला हवी होती.

हेही वाचा – “भाजपने राहुल गांधींविरोधात महिलांना पुढे का केले?” विजय वडेट्टीवार यांनी सांगितले कारण, म्हणाले…

आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपा नेते व खासदार संजय धोत्रेंवर टीका केल्यानंतर आता जिल्ह्यात सत्ताधारी भाजपा व राष्ट्रवादीमध्येच वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

…तर लोकसभा लढण्याची तयारी

लोकसभा आणि विधानसभेसंदर्भात वरिष्ठ स्तरावरून जागा वाटप होईल. भाजपासोबत आमचे नेते अजित पवार यांनी निवडणुकांमध्ये आघाडी केली आणि हा अकोला लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला तर आमची लढण्याची तयारी राहील. भाजपाचे विद्यमान खासदार असल्याने हा मतदारसंघ भाजपाकडेच जाण्याची अधिक शक्यता आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे सुटण्याची आशा कमीच आहे. तरी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटल्यास लढण्याची १०० टक्के तयारी आहे, असे आमदार अमोल मिटकरी म्हणाले.

Story img Loader