येत्या २१मार्चपासून नागपुरात सुरू होणाऱ्या जी-२० अंतर्गत सी -२० परिषेदत नागपुरी संत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या वैदर्भीय संत्र्यांचे ब्रॅण्डिग करा, अशी मागणी माजी मंत्री बच्चू कडू यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जी-२० च्या निमित्ताने नागपुरात होणाऱ्या दोन दिवसीय बैठकीसाठी नागपूरचे ब्रॅंण्डिग हे ‘टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हणून केले जात आहे.

हेही वाचा >>> अमरावती : समग्र शिक्षा अभियानाचे अनुदान परत घेतल्‍याने शाळास्तरावर पेच

नागपूरपासून ३०० किलोमीटर परिसरात असणारे पेंच, ताडोबा, मेळघाटसह अन्य अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प बघण्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने नागपुरात पर्यटक येतात. यामुळे नागपूरला टायगर कॅपिटलअशी  नवी ओळख मिळाली आहे. मात्र त्यापूर्वी शकडो वर्षापासून नागपूर हे  संत्रानगरी म्हणूनच ओळखलेजात होते व आताही त्याच नावाची ओळख दूरवर आहे.  येथील संत्री त्याच्या अविट गोडीमुळे जगप्रसिद्ध आहे. त्याची निर्यात व्हावी, त्यावर प्रक्रिया व्हावी म्हणून नागपूरचे खासदार म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मागील दहा वर्षांपासून सातत्यने प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा >>> “जय बेळगाव, जय कर्नाटक” घोषणेबाबत आमदार धीरज देशमुख यांच्याशी माहिती घेऊन बोलणार, नाना पटोलेंची प्रतिक्रिया

बांगलादेश, दुबईसह  इतरही देशात संत्री जावी म्हणून त्यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. रेल्वे सुरू केल्या. नागपुरात होणाऱ्या जी-२० च्या निमित्ताने वैदर्भीय संत्र्यांचेही ब्रॅण्डिंग व्हावे, अशी मागणी उत्पादकांनी लावून धरली आहे. त्याला माजी मंत्री  बच्चू कडू यांनीही पाठिंबा दिला. त्यांनी  यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना पत्रही दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत सांगितले, असे बच्चू कडू  यांनी सांगितले.

Story img Loader