अमरावती : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असताना राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे.याबाबत प्रहार जनशक्‍ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे आणि स्वाभिमानी संघटनेचे रविकांत तुपकर यांची प्राथमिक चर्चा झाली आहे. दरम्‍यान, ही आमची तिसरी आघाडी राहणार नसून, शेतकरी, शेतमजूर, कष्‍टकऱ्यांची स्‍वतंत्र आघाडी असू शकते, असे बच्‍चू कडू यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

बच्‍चू कडू म्‍हणाले, आम्‍ही तिसरी आघाडी निर्माण करणार नाही. राज्‍यात शेतकरी, शेतमजुरांचे अनेक प्रश्‍न आहेत. ते सोडविण्‍यासाठी प्राथमिकता ठरविण्‍याची गरज आहे. आमची शेतकरी, कष्‍टकऱ्यांची स्‍वतंत्र आघाडी राहू शकते. आम्‍ही मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याकडे प्रस्‍ताव सादर करणार आहोत. आमच्‍या मागण्‍या त्‍यांच्‍यासमोर मांडणार आहोत.विधिमंडळाचे अधिवेशन संपल्‍यानंतर मुख्‍यमंत्री आम्‍हाला चर्चेसाठी निमंत्रण देणार आहेत. त्‍यांच्‍याशी चर्चा केल्‍यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल.मुख्‍यमंत्र्यांनी प्रस्‍ताव मान्‍य केल्‍यास, माझा अचलपूर मतदार संघही त्‍यांना देऊ, असे बच्‍चू कडू यांनी ‘लोकसत्‍ता’शी बोलताना सांगितले.

अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला

हेही वाचा >>>‘नीरी’त सीबीआयच्या छाप्याची चर्चा….पण, नेमका घोटाळा काय….?

सरकारसोबत नाराजीचा विषय नाही. आम्ही मुद्यावरच लढू, चर्चा करू. शेतकरी, मजुरांच्या प्रश्नांवर आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. ते काय सकारात्मकता दाखवतात ते बघू. जर प्रस्‍ताव मान्‍य झाला नाही, तर आपण १५-२० ठिकाणी उमेदवार उभे करून स्वतंत्र लढण्‍याची आपली तयारी आहे, असे बच्‍चू कडू यांचे म्‍हणणे आहे.

हेही वाचा >>>१०० कोटींचा घोटाळा; नागपुरातील ‘नीरी’मध्ये सीबीआयचा छापा

राज्‍यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्‍ये जागावाटपाच्‍या दृष्‍टीने चाचपणी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्‍याने आघाडीचा आत्‍मविश्‍वास वाढलेला असताना दुसरीकडे, महायुती सरकारनेही लोकप्रिय घोषणांच्‍या माध्‍यमातून जनाधार मिळवण्‍यासाठी धडपड सुरू केली आहे. यातच महायुती सरकारला पाठिंबा देणारे आमदार बच्‍चू कडू हे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे, प्रहार संघटनेचे आमदार कडू आणि स्वाभिमानी संघटनेचे तुपकर यांच्यात पुण्यात बैठक झाली. या बैठकीत वेगळी आघाडी स्थापन करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत ठराविक जागा स्‍वतंत्र आघाडीच्‍या वतीने लढविल्‍या जातील, असे संकेत बच्‍चू कडू यांनी दिले आहेत.

महायुती आणि महाआघाडीमध्ये अनेक छोटे पक्ष आहेत; पण त्यांना महत्त्व मिळत नसल्यामुळे ते नाराज आहेत. अशावेळी त्यातील नाराज पक्षांना आपल्या सोबत घेण्याचा या आघाडीतील नेत्यांचा प्रयत्न असल्याचे सांगण्‍यात येते.

Story img Loader