चंद्रपूर : राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप-शिंदे शिवसेना सरकारमध्ये थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने अपक्ष आमदार बच्चु कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी अजितदादांचे स्वागत केले आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला पाठींबा देणाऱ्या अपक्ष आमदारांमध्येच फुट पडल्याचे चित्र दिसून येत आहे.साधारणत: एक वर्षापूर्वी शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेवर आले. शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी थेट गुवहाटी गाठून शिंदे गटात सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेव्हा आमदार जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्यानंतरच शिंदे गटात सहभागी झाल्याचे माध्यमांशी बोलतांना सांगितले होते. मात्र आता अचानक अपक्षांना विश्वासात न घेता भाजपाने राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आठ जणांना मंत्रीपदाची शपथ दिली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिंदे शिवसेना तथा अपक्ष आमदार अजित पवार यांच्या सरकारमधील प्रवेशाने नाराज आहेत. कुणी उघडपणे ही नाराजी बोलून दाखवित आहेत तर कुणी दबक्या आवाजात या प्रवेशाबद्दल तीव्र भावना व्यक्त करित आहेत. अशातच नेहमीच सत्तेच्या बाजूने राहणारे चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी अजित पवार यांचे सरकारमधील प्रवेशाचे स्वागत केले आहे.

हेही वाचा>>>नागपूर: करोना प्रतिबंधात्मक लस कुणी घेईना! पूर्व विदर्भात १.१० लाख लस मात्रा मुदतबाह्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अन्य नेत्यांचा मंत्रीमंडळात केलेला प्रवेश हा विचारपूर्वक आहे. शिंदे व फडणवीस यांच्या या निर्णयाचे तसेच अजित पवार यांचे सरकारमध्ये स्वागत करतो असे अपक्ष आमदार जोरगेवार म्हणाले. हा विचाराअंती केलेला निर्णय आहे. आमदार बच्चु कडू यांना मंत्री व्हायचे आहे, त्यामुळे त्यांची नाराजी असणे साहजीक आहे. आपणाला मंत्री व्हायचे नाही किंवा अन्य पदाची अपेक्षा देखील नाही. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच येत नाही, शिंदे व फडणवीस यांच्या निर्णयासोबत असल्याचेही जोरगेवार म्हणाले.राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने अपक्ष आमदार बच्चु कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla bachhu kadu and kishore jorgewar antagonistic role rsj 74 amy
Show comments