अमरावती : मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍यावर टीका करण्‍याची भाजपाचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांची लायकी नाही, त्‍यांनी आधी आपली लायकी ओळखली पाहिजे. डॉ. बोंडेंनी बेडकाची उपमा देऊन मुख्‍यमंत्र्यांवर टीका केली, त्‍याचा आम्‍ही निषेध करतो. बेडूक कोण हे येणारा काळ ठरवेल, भाजपच्‍या नेत्‍यांनी अशा प्रकारची वक्‍तव्‍ये करणे टाळावे, अन्‍यथा आम्‍ही योग्‍य उत्‍तर देऊ, असा इशारा प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू कडू यांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार बच्चू कडू यांची भाजपच्या अनिल बोंडवर टीका, म्हणाले बेडूक कोण हे येणारा काळ ठरवेल.

भाजपाचे राज्‍यसभा सदस्‍य डॉ. अनिल बोंडे यांनी बुधवारी वाशिम येथे प्रसार माध्‍यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्‍यावर टीका केली होती. त्‍याचे तीव्र पडसाद शिंदे गटात उमटले आहेत. शिंदे यांचे समर्थक असलेले बच्‍चू कडूदेखील आता मैदानात उतरले आहेत.

हेही वाचा – लोकजागर : ओबीसी नेमके कुणाकडे?

प्रसार माध्‍यमांशी बोलताना बच्‍चू कडू म्‍हणाले, एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता, तर भाजपाच्‍या आमदारांना मंत्री म्‍हणून काम करण्‍याची संधी मिळाली नसती, हे आधी भाजपाच्‍या नेत्‍यांनी लक्षात घेतले पाहिजे. अजूनही काहीच सांगता येत नाही. डॉ. बोंडे यांनी एकनाथ शिंदे यांच्‍यावर टीका करून स्‍वत:च्‍या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. त्‍यांनी मुख्‍यमंत्र्यांची माफी मागितली पाहिजे.

हेही वाचा – पश्चिम विदर्भातील बाजारात तुरीचे भाव तेजीतच

शिंदे यांच्‍यावर टीका करण्‍याचे परिणाम भाजपाच्‍या नेत्‍यांना भोगावे लागतील, शिंदे यांनी बाहेर पडण्‍याची भूमिका घेतली नसती, तर भाजपा फुगले नसते, अशीही टीका बच्‍चू कडू यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla bachu kadu criticizes bjp anil bond says who is the frog time will decide mma 73 ssb