भंडारा : राज्यपाल रमेश बैस सध्या विदर्भ दौऱ्यावर असून आज शहापूर येथे होणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमास ते उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार भोंडेकर यांनी बोलताना मंचावर उपस्थित सर्वांची नावे घेतली, मात्र माजी आमदार डॉ. परिणय फुके यांचे नाव घेण्यास ते विसरले. आमदार भोंडेकर हे फुकेंचे नाव घेण्यास विसरले की जाणीवपूर्वक त्यांनी ते टाळले, याबाबत कार्यक्रमस्थळी दबक्या आवाजात चर्चा रंगू लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – बुलढाणा मतदारसंघासाठी ५१ कोटींचा निधी, न्यायाधीशांची निवासस्थाने, रस्ते कामांना मिळणार गती

हेही वाचा – बंदी असतानाही नॉयलॉन मांजाची सर्रास विक्री, अकोल्यात महिलेचा पाय…

जिल्ह्यातील संरक्षण सेवा अकादमी, शहापूर येथे होणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस आणि पालकमंत्री डॉ. गावित यांच्यासह आमदार आणि खासदारसुद्धा मंचावर उपस्थित होते. आमदार भोंडेकर यांना सर्वप्रथम बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. त्यावेळी त्यांनी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांकडे बघून त्यांची नावे घेतली मात्र समोरच बसलेल्या डॉ. फुके यांचे नाव त्यांनी घेतलेच नाही. ही बाब अनेकांच्या लक्षात आली. यावरून आजी आणि माजी आमदारांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात रंगू लागली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla bhonde and parinay fuke tussle mla refrained from taking the former mla name ksn 82 ssb
Show comments