लोकसत्ता टीम

वर्धा: आर्वी येथील भाजपाचे आमदार दादाराव केचे यांनी तळेगाव श्यामजी पंत येथे जाहीर सभेत केलेले भाषण चांगलेच गाजत आहे. यात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव (पीए) सुमित वानखेडे यांच्यावर चढ्या आवाजात नाव न घेता तोफ डागली आहे.

भाजपाचे आमदार दादाराव केचे यांची audio clip – १
भाजपाचे आमदार दादाराव केचे यांची audio clip- २

वानखेडे हे भाजपातर्फे आर्वी मतदारसंघात पक्षाचे पुढील उमेदवार असतील, अशी जोरदार चर्चा आहे. त्याची प्रथमच जाहीर दखल घेत केचे यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे. तसेच गेल्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वीय सचिव सुधीर दिवे यांनी दाखविलेला उत्साह कसा हाणून पाडला, याचेही सडेतोड उत्तर केचे यांनी या भाषणातून दिले आहे.

Story img Loader