वाशिम : राज्यात शेकडो पदवीधर बेरोजगार आहेत. शिकूनदेखील नोकऱ्या नाहीत. बेरोजगारीची भीषण समस्या आहे. अशी गंभीर परिस्थिती असताना सरकार कंत्राटी नोकर भरती काढून पदवीधर युवकांची थट्टा करीत आहे. त्यामुळे कंत्राटी नोकर भरती रद्द करावी, अशी मागणी आमदार धीरज लिंगाडे यांनी केली.
कारंजा शहर काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. धीरज लिंगाडे म्हणाले की, शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि पदवीधर युवकांचा नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला असतानाच केंद्र व राज्य सरकारने सर्वच क्षेत्रांमध्ये कंत्राटी पद्धतीने कारभार सुरू केला असून शासनाच्या या कंत्राटी पद्धती धोरणामुळे पदवीधर बेरोजगारांवर एक मोठे संकट आले असून या धोरणाचा विरोध असून ही नोकर भरती प्रक्रिया रद्द करावी.
हेही वाचा – आता ‘या’ समाजास पण मिळणार ओबीसीमधून आरक्षण?
हेही वाचा – नागपूरसह वाराणसी, मुंबईत छापे; विदेशातून तस्करीचे ३१ किलो सोने जप्त
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भोजराज, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. दिलीप सरनाईक, कारंजा शहर काँग्रेस अध्यक्ष अमीर पठाण, युसब जट्टावाले, सेवादल काँग्रेस शहर अध्यक्ष अॅड. वैभव लाहोटी, कमलेशजी सपकाळ, नितीनजी जाधाव, शिवाजीराव देशमुख, राज चौधरी, अक्षय बनसोड, प्रफुल गवई, फैजल खान, सोराब खान, अयुब भाई, कुंदन तायडे, विठ्ठलराव कवळे, योगेंद्र जमनिक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन काँग्रेस सेवादल जिल्हा समन्वयक अॅड. संदेश जैन जिंतूरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शहर काँग्रेस अध्यक्ष अमिर खान पठाण यांनी केले.