प्रशांत देशमुख

वर्धा : शहराला नवे पर्यटनस्थळ मिळण्याची चिन्हे आहेत.शहरालगत सालोड येथे वन विभागाचे अठरा हेक्टरचे वन क्षेत्र उपलब्ध आहे. याच जागेवर ‘इको टुरिझम पार्क’ उभारण्याचा प्रयत्न आमदार डॉ पंकज भोयर यांच्याकडून सुरू झाला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना त्यांनी विनंती केली होती.त्यावर तात्काळ सकारात्मक भूमिका घेत वनमंत्र्यांनी याबाबत प्रस्ताव सादर करण्याची सूचना खात्याच्या सचिवास केली.

Dharashiv railway station to be tripled in size with modern facilities
अद्ययावत सुविधांसह रेल्वेस्थानक होणार तिप्पट मोठे
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
simhastha kumbh mela
साधुग्राम अतिरिक्त जागेसाठी मेरीच्या जागेचा विचार; गोदाकाठावर पाच नवीन पूल, सिंहस्थ कुंभमेळा बैठक
Rane family on Sindhudurg DPDC
सिंधुदुर्ग डीपीडीसी पूर्णपणे राणे कुटुंबीयांच्या ताब्यात; इतर कोणत्या जिल्ह्यात एकाच कुटुंबाचा वरचष्मा?
Navi Mumbai , APMC , Unauthorized Construction ,
नवी मुंबई : एपीएमसीतील अनधिकृत बांधकामाला प्रशासनाचे अभय? कारवाई करून देखील धान्य बाजारातील अनधिकृत बांधकाम सुरूच
ITC Hotels To Be Second Largest Hotel Company By Market Cap
आयटीसी समूहातील ‘या’ हॉटेल कंपनीचा शेअर बाजारात प्रवेश
Gajanan Vidyalaya located in busy Nabi Subhedar Layout Chowk poses accident risk to students
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, उपराजधानीतील गजानन विद्यालयाजवळील चौकात…
thane accidental death Social activist Pushpa Agashe CCTV cameras teen hath naka
आगाशे यांच्या अपघाती निधनानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

मेघे अभिमत विद्यापीठाच्या जवळ व राष्ट्रीय महामार्गालगत मोक्याच्या या जागेवर पार्क झाल्यास नागरिकांसाठी विरंगुळ्याचे ते चांगले ठिकाण ठरेल.तसेच या निमित्ताने बेरोजगारांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील,असा विश्वास आ.भोयर यांनी लोकसत्ताशी बोलतांना व्यक्त केला.पार्कसाठी २१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

वर्धा जिल्हा सेवाग्राम, पवनार, बोर अभयारण्य व अन्य स्थळांमुळे जिल्हा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.हा इको पार्क त्यात भर घालणारा ठरेल.अर्थमंत्री असतांना मुनगंटीवार यांनी भोयर यांच्या विनंतीवरून विविध कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे हा प्रस्ताव देखील लगेच मान्य होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Story img Loader