महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि भाजप यांचे उमेदवार म्हणून नागो गाणार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. आज शिक्षकांमध्ये जुनी पेन्शन आणि शाळांचे अनुदान हे दोन सर्वाधिक महत्वाचे विषय आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात आणि गाणारांच्या प्रचारसभेतही जुनी पेन्शन देणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. याआधीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीदेखील हीच भूमिका होती. अशा पक्षांच्या उमेदवारांना शिक्षक मतदान करणारच नाही, असाही दावा शिक्षक भारती संघटनेचे प्रमुख आमदार कपिल पाटील यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- बुलढाणा : रणजीत पाटील, धीरज लिंगाडेंसमक्ष ‘नाराजी’ दूर करण्याचे आव्हान!

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कुठे दिसतच नाहीत. त्यांना उमेदवारच मिळत नसल्याचे चित्र आहे. या मोठ्या पक्षांनी निवडणुकीआधीच मान का टाकली, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. शिक्षक भारतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र झाडे यांच्या प्रचारार्थ नागपुरात आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा- नाना पटोले तिहेरी राजकीय संकटात; गृहजिल्ह्यात सत्ताबदलाच्या हालचालींना वेग, विधान परिषद निवडणुकीमुळे डोकेदुखी वाढली

आम्ही विनंती आणि आवाहन केल्यानंतर शिवसेनेने नागपुरातून आपला उमेदवार मागे घेतला. नागपुरात पदवीधर निवडणुकीदरम्यान आम्ही अभिजीत वंजारी यांना पाठिंबा दिला होता. आमचा पाठिंबा नसता तर वंजारी निवडून येणे कठीण होते. त्यावेळी, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजेंद्र झाडे यांना पाठिंबा देऊ असे आश्वासन वंजारी यांनी दिले होते. सभ्य संस्कृतीत शब्दाला किंमत असते. हा शब्द कॉँग्रेसचे कार्यकर्ते पाळतील अशी आशा आहे. नेते काय करायचे ते करो, पण कार्यकर्ते झाडे यांच्या पाठीशी आहेत,” असा दावा पाटील यांनी यावेळी बोलताना केला. झाडे यांचा विजय निश्चित आहे. कॉँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिल्यास त्यांनाही विजयाच्या श्रेयात भाग घेता येईल, असेही पाटील म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla kapil patil taunts devendra fadnavis over decision to stop old pension among teachers dag 87 dpj