करोना काळात मुंबई महापालिकेने  राबवलेल्याकरोना प्रतिबंध उपाययोजनांमध्ये भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी भ्रष्टचार प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करावी, अशी  मागणी मुंबईचे आमदार मिहिर कोटेचा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एका पत्राद्वारे केली.

हेही वाचा >>> करोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय! प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

मुंबई महापालिकेने अधिका-यांच्या‘पंचतारांकीत’ सेवेसाठी  ३४ कोटी ६१ लाख १९ हजार ५३५ रुपये  खर्च केले. एकीकडे जीव धोक्यात घालून सुविधा पुरवणाऱ्या कंत्राटी परिचारकांना सेवेचा मोबदला दिला जात नव्हता. मुंबईत २४ वॉर्डमधील अधिकाऱ्यांना फाईव्ह स्ट्रार सर्विस मिळावी यासाठी ६ मे २०२० ला  ३४ कोटी ६१ लाख ५२५ रुपयांचा शासकीय खर्च मंजूर केला.  या अनावश्यक खर्चाची आपण चौकशी  करावी, अशी मागणी कोटेचा यांनी कली

Story img Loader